Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

स्टार प्रवाहच्या मुरांबा मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री अदिती सारंगधरची होणार एण्ट्री

 स्टार प्रवाहच्या मुरांबा मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री अदिती सारंगधरची होणार एण्ट्री

मालिकेत पहिल्यांदा दिसणार मेडिटेशन हीलरच्या भूमिकेत

 


स्टार प्रवाहच्या मुरांबा मालिकेत लवकरच नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. इरावती मुकादम असं या व्यक्तिरेखेचं नाव असून सुप्रसिद्ध अभिनेत्री अदिती सारंगधर इरावती हे पात्र साकारणार आहे. इरावती परदेशात अनेक वर्षे राहून आता मुकादम कुटुंबात पाऊल ठेवतेय. डावपेच करण्यात हुशार असणाऱ्या इरावतीला रमाची जागा रमासारख्या हुबेहुब दिसणाऱ्या माहीने घ्यायला हवी असं वाटतंय आणि त्याच मनसुब्याने ती मुकादमांच्या घरी आलीय. इरावतीचा प्लॅन यशस्वी होणार का? तिच्या आगमनाने मुकादम कुटुंबात काय वादळ उठणार हे पहाणं उत्सुकतेचं असेल.




या मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना अदिती सारंगधर म्हणाल्या, ‘मुरांबा मालिकेने नुकतेच एक हजार भाग पूर्ण केले. हजारचा टप्पा गाठल्यानंतर अतिशय उत्कंठावर्धक वळणावर मला एका चांगल्या भूमिकेसाठी विचारणा झाली. अश्या पद्धतीची भूमिका मी याआधी केलेली नाही. मी पहिल्यांदा मेडिटेशन हीलरच्या रुपात दिसणार आहे. एका छोट्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा मालिका विश्वात येताना खूप आनंद होतोय. मालिकेत अश्या वळणावर इरावती पात्राची एण्ट्री होतेय जिथे खरं काय आणि खोटं काय याची पारख करण्यात संपूर्ण मुकादम कुटुंब गुंतलं आहे. इरावतीच्या एण्ट्रीने ही गुंतागुंत वाढणार की कमी होणार यासाठी नक्की पहा मुरांबा दुपारी १.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.