*आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’मध्ये झळकणार आयुष भंसाली, साकारणार खास ‘लोटस’ची भूमिका*
आमिर खान यांचा बहुप्रतीक्षित आणि चर्चेतील नवीन चित्रपट ‘सितारे जमीन पर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २००७ मध्ये आलेल्या आणि लाखोंच्या हृदयाला भिडलेल्या ‘तारे जमीन पर’चा हा स्पिरिचुअल सिक्वेल आहे. नुकताच रिलीज झालेला ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे आणि ही फिल्म पुन्हा एकदा एक भावनिक व प्रेरणादायक प्रवास दाखवणार याची अपेक्षा निर्माण झाली आहे.हा हृदयस्पर्शी चित्रपट २० जून २०२५ रोजी सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटात १० नवोदित युवा कलाकारांची चमकदार तुकडी मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच झळकणार आहे. ही आहेत – गुड्डू, सुनील, शर्मा जी, करीम, लोटस, बंटू, सतबीर, राजू, गोलू आणि हरगोविंद – ही जिद्दी आणि उत्साही मुलांची टोळी त्यांच्या प्रशिक्षक गुलशन यांच्या मार्गदर्शनाखाली एका भावनिक प्रवासावर निघते, ज्यात आहे हास्य, धमाल, संघर्ष आणि स्पर्शून जाणारे क्षण.
या नव्या कलाकारांमध्ये विशेष लक्ष वेधून घेत आहे आयुष भंसाली, जो या चित्रपटात ‘लोटस’ हे पात्र साकारत आहे. आमिर खान प्रोडक्शन्सने आयुषचा एक खास व्हिडीओ शेअर करत लिहिले, "दूरून पाहिलं तेव्हा कमाल वाटलं, जवळून पाहिलं तेव्हा ‘कमााल’ होता." 🪷
चित्रपटात झळकणारे इतर नवोदित कलाकार म्हणजे अरुष दत्ता, गोपीकृष्ण वर्मा, सम्वित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषी शाहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर.
चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे आर. एस. प्रसन्ना यांनी, जे ‘शुभ मंगल सावधान’ या सामाजिक संदेश देणाऱ्या यशस्वी चित्रपटासाठी ओळखले जातात. आता ते आमिर खान प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर परतले आहेत.
‘सितारे जमीन पर’ मध्ये आमिर खान आणि जेनेलिया देशमुख प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. गाण्यांना शब्द दिले आहेत चित्रपटाचं पटकथा लेखन दिव्य निधी शर्मा यांनी केलं असून याचे निर्माते आहेत आमिर खान, अपर्णा पुरोहित आणि रवि भागचंदका.
👉 [इंस्टाग्राम व्हिडीओ लिंक](https://www.instagram.com/reel/DKCDng8zfUs/?igsh=MWh0bXltNDd3emV2YQ==)