Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आलिया भट्टच्या कान्स लुकमुळे ‘लव्ह अँड वॉर’चा क्रेझ वाढला –

 *आलिया भट्टच्या कान्स लुकमुळे ‘लव्ह अँड वॉर’चा क्रेझ वाढला – नेटिझन्स म्हणतात, “आता अधिक वाट पाहवत नाही!”* 



भारतीय सिनेसृष्टीत भव्य आणि भावनांनी परिपूर्ण चित्रपटांची ओळख निर्माण करणारे दिग्दर्शक संजय लीला भंसाळी पुन्हा एकदा आपल्या पुढील मेगा प्रोजेक्ट ‘लव्ह अँड वॉर’ द्वारे जादू साकारण्यास सज्ज आहेत. या चित्रपटात केवळ प्रचंड भव्यता आणि भावनिक खोली असणार नाही, तर बॉलीवूडचे तीन दमदार कलाकार – विकी कौशल, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट प्रथमच एकत्र झळकणार आहेत.



भंसाळी यांच्या प्रत्येक चित्रपटात झळकणाऱ्या अभिनेत्रीला एक खास ओळख मिळते – तिला “भंसाळी हीरोइन” असं संबोधलं जातं. ही ओळख त्या अभिनेत्रीच्या अभिनयातील खोली आणि भव्य सादरीकरणाचं प्रतीक असते.



भंसाळींच्या चित्रपटांचे वैशिष्ट्य केवळ त्यांची भव्य मांडणी नव्हे, तर त्यामधील स्त्री पात्रांची ताकदवान आणि गूढ सादरीकरण देखील असते. कोणत्याही इतर दिग्दर्शकांकडे ती जादू नसते जी भंसाळींमध्ये आहे – जी त्यांच्या महिला पात्रांना इतक्या देखण्या, भावपूर्ण आणि प्रभावशाली स्वरूपात उभी करते. त्यांच्या चित्रपटांतील स्त्री पात्रं प्रेक्षकांच्या मनात दीर्घकाळासाठी घर करतात.



अलीकडेच, ‘लव्ह अँड वॉर’ची लीड अभिनेत्री आलिया भट्टने कान्स २०२५ च्या रेड कार्पेटवर तिच्या मोहक आणि रॉयल उपस्थितीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तिनं पुन्हा सिद्ध केलं की ती खरी अर्थानं एक “भंसाळी हीरोइन” आहे.


आलियाचा हा साधेपणाने नटलेला पण राजेशाही लुक पाहून सोशल मीडियावर चाहते प्रचंड उत्साहित झाले आहेत. अनेक जण म्हणत आहेत की तिचं हे बदलेलं रूप स्पष्टपणे दर्शवतं की ती भंसाळींच्या ‘लव्ह अँड वॉर’सारख्या भव्य चित्रपटासाठी पूर्णपणे तयार आहे.



नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया:


“आत्तापासूनच तिला ‘लव्ह अँड वॉर’मध्ये पाहतोय, ओ माय गॉड!”

 “ती ‘मुख्य पात्र’ वाली एनर्जी घेऊन येतेय, आता अजिबात वाट पाहवत नाही!”

 “इतकी सुंदर दिसतेय... जर तुम्हालाही तिच्या ‘लव्ह अँड वॉर’ लुकची वाट पाहताय, तर लाईक दाबा!”

 “लांब गाउनमध्ये तिचं सौंदर्यच वेगळं भासतंय, ‘लव्ह अँड वॉर’ लुक पाहायला हवा आता!”

“आलिया मॅडम, आम्हा सर्वांना तुम्हाला ‘लव्ह अँड वॉर’मध्ये पाहायचंय, फारच उत्सुकता आहे!”

 “चेहरा, अभिनय, ती भंसाळी हीरोइनची तयारी – सगळं रिअल वाटतंय!”

“कान्सची क्वीन आणि आता ‘लव्ह अँड वॉर’ची देखील!”

“2025 कान्स, 2025 ‘लव्ह अँड वॉर’ – केवळ क्वीन एनर्जीच दिसतेय!"

 “आलिया ‘लव्ह अँड वॉर’मध्ये किती सुंदर दिसेल याची कल्पनाच सुंदर आहे!”

आलियाचा हा लुक पाहून प्रेक्षकांमध्ये संजय लीला भंसाळींच्या ‘लव्ह अँड वॉर’ साठीची उत्सुकता आणखी वाढली आहे. काही रिपोर्ट्सनुसार, आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि विकी कौश सध्या एका तीव्र भावनिक सीनसाठी एकत्र शूटिंग करत आहेत.

चित्रपटाची अनेक माहिती अजून गुप्त ठेवण्यात आली आहे, पण चर्चा पाहता एवढं निश्चित आहे की ‘लव्ह अँड वॉर’ हा चित्रपट बॉलीवूडसाठी एक प्रचंड सिनेमॅटिक धमाका ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.