Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

"रेड 2 ने १०० कोटींचा टप्पा पार केला, याबद्दल मी मनापासून आभारी आहे!" – वाणी कपूर

 "रेड 2 ने १०० कोटींचा टप्पा पार केला, याबद्दल मी मनापासून आभारी आहे!" – वाणी कपूर


ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘रेड’ चित्रपटाच्या बहुप्रतिक्षित सिक्वेल ‘रेड 2’ ने भारतीय बॉक्स ऑफिसवर अधिकृतपणे ₹१०० कोटींचा आकडा पार केला आहे. हा महत्त्वपूर्ण टप्पा चित्रपटाच्या प्रभावशाली कथानकाला आणि देशभरातील प्रेक्षकांच्या पसंतीला अधोरेखित करतो.



राज कुमार गुप्ता दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण, वाणी कपूर आणि रितेश देशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात अजय देवगणच्या समोर झळकलेली अभिनेत्री वाणी कपूरने प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद आणि चित्रपटाच्या यशाबद्दल आनंद व कृतज्ञता व्यक्त केली.


वाणी कपूर म्हणाली, “रेड 2 ने १०० कोटींचा टप्पा पार केला आणि एक ब्लॉकबस्टर म्हणून साजरा केला जात आहे, यासाठी मी अत्यंत आभारी आहे. या लोकप्रिय फ्रँचायझीचा भाग होणे माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. माझ्या अभिनयाला मिळणाऱ्या प्रेमाबद्दल मी नम्रपणे कृतज्ञता व्यक्त करते. एक अभिनेत्री म्हणून, मी विविध प्रकारचे भूमिकांमध्ये काम करण्याचा आणि प्रत्येक प्रकल्पातून शिकण्याचा प्रयत्न करते. प्रेक्षकांकडून मिळणारा असा प्रतिसाद खूपच प्रेरणादायक आणि समाधान देणारा असतो. 'रेड 2'च्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन करते. देशभरातून मिळणारे प्रेम आणि पाठिंबा आमच्यासाठी खूप खास आहे.”


या मैलाचा दगड गाठून, ‘रेड 2’ने आपली यशस्वी घौडदौड कायम ठेवली असून, वर्षातील एक प्रमुख हिट म्हणून आपली जागा पक्की केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.