*"रामनवमी विशेष सप्ताहात स्वामींच्या रामरूप दर्शनाने प्रेक्षक भावविभोर"*
पहा जय जय स्वामी समर्थ सोम ते शनि रात्री ८.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
*मुंबई ८ एप्रिल, २०२५ :* कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ मालिकेत रामनवमीच्या निमित्ताने साजरा झालेला विशेष भाग आणि सुरू झालेला रामनवमी सप्ताहाचे कथानक, भक्ती, आणि मूल्यांचा एक प्रभावी संगम ठरले आहे. या विशेष पर्वाने एकीकडे राम आणि सीतेच्या नात्यातील विश्वासाचं गोड तत्व प्रेक्षकांसमोर मांडलं, स्वामींच्या रामरूप दर्शनाने प्रेक्षक भावविभोर झाले आहेत तर दुसरीकडे सत्यवान आणि कलावती या जोडप्याच्या रूपात त्या मूल्यांची आजच्या काळातील गरज दाखवली जात आहे. या दोन्ही कथांमध्ये स्वामींच्या लीलेचा उत्कट परिपाक प्रेक्षक सध्या अनुभवता आहेत. स्वामींमध्ये असलेले दैवी तत्व आणि त्याचा श्रीरामांनी जपलेल्या मूल्यांच्या अनुषंगाने होणारा साक्षात्कार मालिकेच्या आगामी भागातही प्रेक्षकांना अनुभवता येईल. येत्या शनिवारी १२ एप्रिलला हनुमान जयंतीच्या दिवशी या सप्ताहाची महासांगता होणार आहे.
स्वामींच्या भक्तांना साजऱ्या केलेल्या रामनवमी उत्सवातल्या संदेशाने "पतीपत्नीच्या नात्यातील विश्वास हा खऱ्या भक्ती इतकाच पवित्र आहे." हे सांगत गोष्ट पुढे सरकते सत्यवान आणि कलावतीकडे, जे गरिब असूनही परस्परांवर निस्सीम प्रेम करणारे रामभक्त असतात. मात्र सत्यवानचा अतिरेकी स्वभाव आणि नरहरीची वाकड्या नजरेतून उगम झालेली कटकारस्थानं त्यांच्या आयुष्यात वादळ निर्माण करतात. स्वामींची लीला तिला यातून कशी वाचवते आणि याकथेतून स्वामी आताच्या काळातही सुसंगत असलेला संदेश कसा देतात. हे आवर्जून अनुभवण्यासारखे आहे.
तेव्हा स्वामींची जीवनमूल्यांची ही शिकवण आवर्जून अनुभवा, रामनवमी विशेष सप्ताहात दररोज रात्री ८.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.