*साक्षात्कार होणार आई तुळजाभवानीच्या ‘रामवरदायिनी’ रूपाचा*
पहा आई तुळजाभवानी सोम ते शनि रात्री ९.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
*मुंबई ९ एप्रिल, २०२५ :* कलर्स मराठीवरील आई तुळजाभवानी मालिकेत नेहेमीच वेगवेगळ्या घटना, तुळजाभवानीच्या भक्तांचे किस्से, देवीने असुरांचा केलेला संहार पहायला मिळतो. या आठवड्यात मालिकेत चैत्र नवरात्रामधल्या स्कंदमातेच्या पूजनाच्या दिवशी कार्तिकेय येतो आणि त्याच्या हातून महादेव शंख वाजवून घेतात. त्यांची ही भेट आणि महादेवांनी त्याच्या हातून घडवून आणलेली कृती याचा अर्थ काय याचा उलगडा मालिकेत होतो आहे. या आठवड्यात अजून एक घटना घडणार आहे ज्यात देवीच्या रामवरदायिनी देवी रूपाची गोष्ट सादर होणार आहे. देवी भक्तांसाठी ही अलौकिक गोष्ट ठरणार आहे. देवीचे हे रूप आणि तिला तुकाई देवी या नावाने ही ओळखले जाणे तेव्हा पासून सुरू झाले. प्रभू रामचंद्र आणि आई तुळजाभवानी यांच्यातला हा प्रसंग नेमका कोणता याचा अत्यंत रंजक खुलासा मालिकेच्या या आठवड्यातल्या भागांमध्ये होणार आहे. जाणून घेण्यासाठी बघा आई तुळजाभवानी सोम ते शनि रात्री ९.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
मालिकेत सध्या सामान्य गावकऱ्यांचे प्रश्न हाताळून भक्त उद्धाराची,त्यांना शिकवणूक देण्याची गाथा सुरू आहे, त्यात एका गावकरी स्त्रीला तिचे चारित्र्य सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागते. त्यावेळी दुर्दैवाने स्त्रीला अशीच परीक्षा भविष्यात द्यावी लागेल असे सुतोवाच देवीकरते आणि सीतेच्या अग्निपरीक्षेचा उल्लेख होतो आणि भविष्यात श्री विष्णु ह्यांचा अवतार असलेले श्री राम हे त्यांच्या पत्नीला शोधण्यासाठी जातील तेव्हा मी त्यांना मार्गदर्शन करेन असे सांगताना भविष्यात घडणारी ती घटना आपण दाखवतो आणि रामवरदायिनी देवी अर्थात तुकाई देवीची गोष्ट उलगडत जाते.