*तो परत येतोय !*
*देवमाणूस - मधला अध्याय*
झी मराठीवर *‘देवमाणूस‘* मधला अध्याय या मालिकेचा प्रोमो प्रसारीत झाला आणि देवमाणूसच्या या तिसऱ्या सीजनमध्ये काय नवीन पाहायला मिळणार? यात कोण कोण कलाकार असणार ? याची सगळीकडे चर्चा सुरू
झाली. तर मालिकेत परत एकदा आपल्याला देवमाणसाच्या मुख्य भूमिकेत अभिनेता *किरण गायकवाड* दिसणार आहे. त्याच बरोबर आधीच्या दोन्ही सीजन गाजवणारी आणि तिच्या अस्सल गावरान भाषेने प्रेक्षकांच मन जिंकलेली सरू आज्जी म्हणजे *रुक्मिणी सुतार* सुद्धा असणार आहेत. तसेच या मालिकेत पहिल्या दोन सीझनप्रमाणेच गावातली अनेक नवीन इरसाल पात्र पाहायला मिळणार आहेत.
*देवमाणूस - मधला अध्याय* , या मालिकेची कथा, पहिल्या आणि दुसऱ्या सीजनच्या मधली आहे. डॉक्टर आजीतकुमार देव कातळवाडीतून निघून गेल्यानंतर आणि तो परत येऊन त्याला फाशी झाली, त्याच्या मध्ये तो कुठे होता ? काय करत होता ? तिथेही तो कसा पोहचला, त्याने कुणाला फसवल, माणसांच्या विश्वासाचा कसा गैरफायदा घेतला. हे सगळ आपल्याला देवमाणूस मधला अध्याय , या मालिकेत बघायला मिळणार आहे. आधीच्या दोन्ही सीजनप्रमाणे या मालिकेचही *लेखन स्वप्नील गांगुर्डे आणि विशाल कदम हीच जोडगोळी करणार आहे. स्वप्नील गांगुर्डे पटकथा तर विशाल कदम संवाद लेखन करणार आहेत* . त्यामुळे पहिल्या दोन्ही सीजनप्रमाणे याही मालिकेत उत्कंठा वाढवणारे कथानक आणि अस्सल गावरान म्हणी, खुसखुशीत संवाद असणार आहेत. या मालिकेचे दिग्दर्शन प्रसिद्ध *दिग्दर्शक राजू सावंत* करत आहेत. त्यांनीच आधीच्याही दोन्ही सीझनच दिग्दर्शन त्यांनी केलय. त्यामुळे देवामाणूसची जादू कायम राहणार हे निश्चित. *वज्र प्रोडक्शनच्या श्वेता शिंदे आणि संजय खांबे यांनी या मालिकेची निर्मिती केली असून, लवकरच तुम्हाला झी मराठीवर ही मालिका पाहायला मिळणार आहे.*