Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*आदित्यचं हृदयस्पर्शी प्रोपोजल पाहून पारू होकार देणार का ?*

*आदित्यचं हृदयस्पर्शी प्रोपोजल पाहून पारू होकार देणार का  ?*

*आदित्य आणि पारूचे प्रेम येणाऱ्या वादळातून वाचू शकेल का?*



नशिबाच्या भावनिक वळणात, आदित्य आणि पारूची प्रेमकहाणी उलगडत असताना प्रेक्षक प्रेम, मैत्री आणि सस्पेन्सच्या एका रोलरकोस्टर प्रवासावर जाणार आहेत. पारूची  प्रेम कथा लवकरच एक नाट्यमय वळण घेणार आहे. ज्याची प्रेक्षक आतुरतेनी वाट पाहत होते.  हे सर्व तेव्हा सुरू होते जेव्हा  प्रीतमला आदित्य  आणि पारूमधील प्रेमाबद्दल कळत. प्रीतमला वाटतंय की आदित्यने पुढचे मोठं पाऊल उचलण्याची वेळ आली आहे. प्रीतमच्या प्रोत्साहनामुळे, आदित्य त्याच्या आयुष्यातील प्रेमाला प्रपोज करण्याचा गंभीरपणे विचार करू लागलाय.



 प्रीतमच्या मदतीने आदित्य पारूसाठी एक भव्य आणि अविस्मरणीय प्रपोजल प्लॅन करतोय. अखेर तो क्षण येतो. भावना आणि उत्साहाने भरलेल्या सुंदर सजवलेल्या वातावरणात, आदित्य त्याच्या मनातली गोष्ट पारुल सांगणार आहे. हा एक जादुई क्षण असणार आहे, जो  प्रेम आणि आनंदाने भरलेला आहे. पण यात नियती एक वेगळा खेळ रचत आहे.  गुरुजी, अचानक येतात आणि पारू समोर  एक धक्कादायक खुलासा करतात. ते तिला इशारा देतात की तिच्याच कुटुंबातील कोणीतरी तिला इजा करण्याचा कट रचत आहे. ही भविष्यवाणी नव्याने फुललेल्या प्रेमावर सावली टाकते. 

 


*आदित्यचं  हृदयस्पर्शी प्रोपोजल पाहून पारू त्याचे प्रोपोसल स्वीकारेल का? गुरुजींचा इशारा खरा ठरेल का?  आदित्य आणि पारूचे प्रेम येणाऱ्या वादळातून वाचू शकेल का?* *यासाठी बघायला विसरू नका पारू दररोज संध्या ७:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.*



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.