प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ताचा नवा लूक
सईचा रुसवा घालवण्यासाठी मुक्ताने शोधली नवी युक्ती
प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ता एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. हा नवा अवतार मुक्ता धारण करणार आहे लाडक्या सईसाठी. सईवर मुक्ताचं जीवापाड प्रेम आहे. सईशिवाय ती एक क्षणही राहू शकत नाही. मात्र चिमुकली सई मुक्ताईवर रुसली आहे. मुक्ताईचं पूर्वीसारखं आपल्यावर प्रेमच नाही असा गैरसमज तिने करुन घेतला आहे. म्हणूनच तर रागावलेली सई सध्या मुक्तापासून दूर सावनीच्या घरी रहात आहे. सईचा रुसवा घालवण्यासाठी मुक्ताने एक नवी युक्ती शोधून काढली आहे. वृद्ध गोदा मावशीचा वेश धारण करुन ती सावनीच्या घरी सईला भेटण्यासाठी जाणार आहे. आपल्या मुलांच्या प्रेमाखातर एक आई काय काय करु शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुक्ताई. मुक्ताचं हे नवं रुप सावनीला सळो की पळो करुन सोडणार हे मात्र नक्की.
हा नवा लूक साकारण्यासाठी मुक्ता म्हणजेच अभिनेत्री स्वरदा ठिगळे फारच उत्सुक आहे. ‘पहिल्यांदाच अश्या प्रकारची भूमिका साकारते आहे. गोदा हे नवं पात्र साकारण्यासाठी माझी ४ वेळा लूक टेस्ट झाली. संपूर्ण टीमने हा लूक साकारण्यासाठी बरीच मेहनत घेतली आहे. मुळात गोदा नागपूरची आहे. या पात्राच्या निमित्ताने नागपूरची भाषा शिकायला मिळाली. मुक्ताचं हे रुप आजवर मालिकेत कधीही पाहायला मिळालं नाहीय. मला स्वत:ला हे पात्र साकारताना मज्जा येतेय. प्रेक्षकांनाही गोदा नक्कीच आवडेल याची खात्री आहे अशी भावना स्वरदा ठिगळेने व्यक्त केली.’
तेव्हा पाहायला विसरु नकी प्रेमाची गोष्ट नव्या वेळेत म्हणजेच सायंकाळी ६.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.