*केदार शिंदे आणि जिओ स्टुडिओज् यांच्या सूरज चव्हाण अभिनित "झापुक झुपूक" या चित्रपटाचे चित्रिकरण यशस्वीरित्या झाले पूर्ण!*
बाईपण भारी देवा चित्रपटाच्या भरघोस यशानंतर जिओ स्टुडिओज् आणि केदार शिंदे ही सुपरहीट जोडी, सूरज चव्हाण अभिनित चित्रपट "झापुक झुपूक" येत्या २५ एप्रिल २०२५ रोजी सिनेमागृहांत प्रदर्शित करण्यास सज्ज झाले आहेत. चित्रपटाची संपूर्ण टीम गेल्या एक महिन्यापासून महाराष्ट्रातील वाई या ठिकाणी शुटिंग करत होते. आज निर्मात्यांनी आपल्या सोशल मिडियावरून सेटवरच्या शेवटच्या दिवसाचा फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे.
'बिग बॉस मराठी ५" विजेता आणि प्रसिद्ध रीलस्टार सुरज चव्हाण याचा हा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे खूप आनंदी, थोडा भावूक अशा मिश्र भावना सूरज ने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट व्यक्त केल्यात.
लिंक- https://www.instagram.com/reel/DG2TpDGoXam/?igsh=cmdjeTY4dXVtd2Z3
दिग्दर्शक केदार शिंदे आपल्या संपूर्ण टीम चे आभार मानत म्हणाले की, "चित्रपटाची घोषणा झाल्यापासून ते चित्रिकरण संपेपर्यंत माझ्या क्रू मधील प्रत्येक मेंबर ने दिवसरात्र कष्ट घेतले आहेत. माझ्या कलाकारांनी सुद्धा तेवढीच साथ दिलीय त्यामुळेच आम्हीं अवघ्या एका महिन्यात संपूर्ण चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण करू शकलो. आता जिओ स्टुडिओज आणि मी लवकरात लवकर पोस्ट प्रोडक्शन चे काम पूर्ण करुन मायबाप प्रेक्षकांसमोर एक नवीन कलाकृती सादर करण्यास उत्सुक आहोत."
सूरज चव्हाण बरोबरच जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी, स्वप्नील परजणे आणि दीपाली पानसरे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित, निर्माती ज्योती देशपांडे, निर्माती सौ. बेला केदार शिंदे , केदार शिंदे दिग्दर्शित *झापुक झुपूक* हा धमाल चित्रपट येत्या २५ एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्रतील सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे.