*जिओ स्टुडिओज् ची 2025 मध्ये धमाकेदार सुरवात , चित्रपट स्काय फोर्स सह 8+ OTT फिल्म्स सक्सेसफुली रिलीज*
आर्टिकल 370, लापता लेडीज आणि शैतान यांसारख्या हिट, तसेच स्त्री 2 आणि सिंघम अगेन सारख्या विक्रमी ब्लॉकबस्टर्सने 2024 हे वर्ष गाजवून जिओ स्टुडिओजने मनोरंजन उद्योगात एक प्रभावशाली म्हणून स्वतःची स्थापना केली आहे. 2025 मध्ये ही स्काय फोर्स चित्रपट रिलीज करून बॉक्स ऑफिसवर जोरदार कामगिरी केली आहे. फक्त सिनेमागृहातच नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही 8+ एका पेक्षा एक प्रभावशाली कंटेंट देऊन पहिल्या तिमाहीच्या आधीच जोरदार प्रभाव पाडला आहे. ज्यात सानिया मल्होत्रा अभिनित मिसेस ZEE5 वर रिलीज झाला असून दशकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. नेटफ्लिक्स वर धूम धाम, जियो हॉटस्टार वर द स्टोरीटेलर आणि कौशलजीस वर्सेस कौशल सामिल आहेत. हे सर्व चित्रपट केवळ ओटीटी चार्टवरच नाहीत तर Ormax अहवालातही आघाडीवर आहेत.
जिओ स्टुडिओज सर्व शैलींमध्ये उच्च-गुणवत्तेचा आशय वितरीत करण्यावर आपले लक्ष केंद्रित करत आहे, त्यामुळे प्रेक्षक पुढील एका रोमांचक वर्षाची अपेक्षा करू शकतात. अशा प्रकारे वेगवेगळया कथा आणि मनोरंजनानी भरपूर प्रवास करत जिओ स्टुडिओज मनोरंजन उद्योगाच्या शीर्षस्थानी आपले स्थान आणखी मजबूत करत आहे.