Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*मला खात्री आहे की जेवढं प्रेम तुम्ही माझ्यावर केलं तितकच प्रेम तुम्ही मृण्मयीला द्याल - दिशा परदेशी*

*मला खात्री आहे की जेवढं प्रेम तुम्ही माझ्यावर केलं तितकच प्रेम तुम्ही मृण्मयीला द्याल - दिशा परदेशी*

*आता मृण्मयी गोंधळेकर साकारणार तुळजाची भूमिका !*


गेले जवळपास वर्षभर *'लाखात एक आमचा दादा'* मालिकेवर आणि मालिकेच्या प्रत्येक पात्रवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेमाचा वर्षाव केला. आता मालिकेत एक मोठा बदल घडत आहे कारण मालिकेत तुळजाची भूमिका साकारणारी दिशा परदेशी मालिकेला निरोप देत आहे. *दिशा कडून ऐकूया तिचा हा प्रवास कसा होता आणि मालिकेला निरोप देत असताना तिच्या मनात काय भावना आहेत.*



‘तुळजा’ ही भूमिका साकारताना खूप मज्जा आली कारण जशी तुळजा निंबाळकर आहे, तशी दिशा परदेशी अजिबात नाहीये. तुळजा स्वावलंबी आणि निर्णय घेण्यात परिपूर्ण आहे, त्यामुळे ही भूमिका साकारत असताना एक वेगळाच आत्मविश्वास माझ्यात यायचा. तुळजा कडून खूप काही शिकायला मिळाल, कारण मी खासगी आयुष्यात खूप चंचल, खोडकर आहे पण तुळजा साकारताना दिशाची एक वेगळी बाजू प्रेक्षकांना दाखवता आली, पण आता मी तुळजाची भूमिका साकारणार नाहीये. पण तिच्या काही गोष्टी मी माझ्या खासगी जीवनात नक्की लक्षात ठेवणार आहे. सर्वांना प्रश्न पडला असेल की मी मालिका का सोडतेय, तर मी म्हणेन आरोग्याच्या पलीकडे काहीही नाही आणि या कारणामुळे मला मना विरोधात जाऊन  "लाखात एक आमचा दादा" मालिकेला निरोप द्यावा लागत आहे. मी खूप प्रयत्न केला यातून बाहेर पडण्याचा पण डॉक्टरांच्या सल्ला आहे की मला आरामाची गरज आहे. मी आणि मालिकेच्या टीमने खूप मेहनत घेतली तुळजा साकारण्यासाठी.  मला खात्री आहे की जेवढं प्रेम तुम्ही या तुळजाला दिलं तितकंच किंबहुना त्यापेक्षा जास्त प्रेम नवीन तुळजाला द्याल. मी जरी मालिका सोडून जात असले तरीही ही माझीच मालिका आहे असं मी नेहमीच म्हणत राहीन, कारण या प्रवासात मी पहिल्या दिवसापासून जोडली गेली आहे. जरी हा प्रवास माझा इथे थांबला असेल तरी मी " लाखात एक आमचा दादा" मालिकेचा सदैव भाग राहीन."


मी पुन्हा एकदा लास्ट टाईम तुळजा म्हणून कृतज्ञतेने साइन ऑफ करेन. तुमचा आशीर्वाद आणि प्रेम पुढच्या वाटचालीसाठी सोबत राहू दे. पाहायला विसरू नका 'लाखात एक आमचा दादा' दररोज रात्री ९.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.