Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*ऑनलाइन घोटाळ्यांपासून सावधान! सतर्कतेचा इशारा द्यायला येतोय ‘फ्रॉम चायना विथ लव्ह’*

 *ऑनलाइन घोटाळ्यांपासून सावधान! सतर्कतेचा इशारा द्यायला येतोय ‘फ्रॉम चायना विथ लव्ह’*


*अनिकेत वाघ दिग्दर्शित, अभिनीत ऑनलाइन फ्रॉडपासून वाचवायला सज्ज झालाय ‘फ्रॉम चायना विथ लव्ह’*

*’फ्रॉम चायना विथ लव्ह’ या ऑनलाइन घोटाळ्यापासून सावधान करणाऱ्या चित्रपटाचा ट्रेलर समोर*



सध्या ऑनलाइन घोटाळ्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. घोटाळेबाज फसवणुकीसाठी नवनवीन युक्त्या वापरत आहेत.  ऑनलाइन खरेदीकडे लोकांचा वाढता कल बघता, घोटाळेबाज ऑनलाइन ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन युक्त्या शोधत आहेत. या घोटाळ्यांमुळे अनेकांची बँक खातीदेखील रिकामी झाली आहेत. हे सायबर चोरटे लोकांचा पैसा लुटण्यासाठी वेगवेगळी तंत्रे अवलंबताना दिसतात. सायबर चोरट्यांच्या यूपीआय घोटाळ्याने नागरिकांची डोकेदुखी वाढवली आहे. अनेकांची घरं उध्वस्त झाली आहेत. 


या सर्व प्रकारात जेव्हा सर्वसामान्य नागरिक अडकतो तेव्हा तो याचा नेमका कसा सामना करतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे फ्रॉम चायना विथ लव्ह हा चित्रपट होय.


नुकताच ‘फ्रॉम चायना विथ लव्ह या चित्रपटाचा  ट्रेलर लॉंच सोहळा पुण्यात अगदी दणक्यात साजरा झाला. यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.


हा सिनेमा आजपर्यंत भारतातील कुठल्याच भाषेतील फिल्म इंडस्ट्री बोलू शकली नाही अशा विषयावर भाष्य करतो. 

online money fraud सध्याचं एक अदृश्य चक्रव्यूह आहे. ज्यात माणूस खूप सहजतेने अडकतो पण त्यातून बाहेर येण्याचा मार्ग काही त्याला सापडत नाही. एखादी सर्वसामान्य व्यक्ती जेव्हा या सगळ्यात अडकते तेव्हा काय काय घडतं आणि ते तुमच्या सोबत घडू नये असं वाटत असेल तर हा सिनेमा आवर्जून पाहायला हवा.



‘अनिकेत वाघ क्रिएशन’ अंतर्गत बनलेल्या  या चित्रपटाचे दिग्दर्शन,अभिनय,लेखन आणि निर्माता अशी चौफेर धुरा अनिकेत वाघ यानी उत्तमरित्या सांभाळली आहे. अनिकेत वाघसह चित्रपटात अंकुश मांडेकर,सिद्धेश्वर झाडबुके, गायत्री बनसोडे, सोनाली भांगे, निलेश होले, प्रसाद खेडकर ही कलाकारांची फौज पाहायला मिळतेय. तर चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी प्रशांत फासगे यांनी सांभाळली आहे. तसेच चित्रपटाचे शीर्षक गीत कश्मिरा खोत हिने स्वरबद्ध केले आहे.


तुम्हाला  या ऑनलाइन फ्रॉडमध्ये अडकायचे नसल्यास नेमक काय करावं हे पाहण्यासाठी येत्या २८ फेब्रुवारी २०२५ ला जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की पाहा "फ्रॉम चायना विथ लव्ह".

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.