*गायिका ते अभिनेत्री – ‘मनमोही’ मधील सावनी रवींद्रचा नवा अवतार भाव खाऊन गेला!*
*सावनी रवींद्रच्या मधुर आवाजासोबत तिच्या अभिनयाचीही चर्चा – ‘मनमोही’ची जादू!*
*‘मनमोही’ गाण्यात सावनी रवींद्रच्या अभिनयाची जादू, अभिजित खांडकेकरसोबत मनमोहक केमिस्ट्री!*
'मनमोही' रोमॅंटिक गाण्यातील सावनी रवींद्र आणि अभिजित खांडकेकरच्या अभिनयाची झलक समोर*
सर्वत्र व्हॅलेंटाईन वीक सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. आणि या व्हॅलेंटाईन वीक दरम्यान अनेक नवनवीन प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. अशातच सर्वांची लाडकी, राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रविंद्र हिच्या सुद्धा एका सुंदर अशा गाण्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. सावनीने आजवर अनेक भाषांमध्ये गायन केले आहे.तसेच मराठी आणि इतर भाषिक चित्रपटांसाठी अनेक सुमधूर गाणी गायली आहेत.
आणि आता तिने तिच्या फॅन्स साठी valentine's days च्या निमित्ताने "मनमोही" या गाण्याची भेट दिली आहे.
यामधे फक्त गाण्यावरच ती न थांबता तिने या गाण्यात अभिनयसुद्धा केला असल्याचं पाहायला मिळतंय.
'मनमोही' असे या गाण्याचे नाव असून या गाण्यात सावनी रविंद्र सह सुप्रसिद्ध अभिनेता अभिजीत खांडकेकरने मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. तसेच लोकप्रिय बालकलाकार केया इंगळे हिने साकारलेली भूमिका ही लक्षवेधी ठरली आहे. "मनमोही" चं सुंदर संगीत प्रणव हरिदास याचे असून वलय मुळगुंद याचे शब्द मनाला भावणारे आहेत. सावनी बरोबर या गाण्यात सुप्रसिद्ध गायक अभय जोधपुरकर याच्या आवाजाची जादू अनुभवायला मिळते.
'मनमोही' या गाण्याची कथाही आशयघन असल्याचे पाहायला मिळते. एक मोडलेला संसार जेव्हा दुसरा व्यक्ती येऊन सावरतो आणि त्या कुटुंबाला आधार देतो याचं वर्णन या गाण्यातून करण्यात आलं आहे.
गाण्याबद्दल बोलताना सावनी म्हणाली, "या गाण्याला अल्पावधीतच प्रेक्षकांचा मिळालेला पाठिंबा पाहून खूप छान वाटतंय. सावनी ओरिजनल चं हे पहिलं असं मराठी गाणं आहे ज्यात मी गायन आणि अभिनयाच्या दोन्ही भूमिका साकारल्या आहेत. आजवर 'सावनी ओरिजनल'मध्ये मी तामिळ, तेलगू, मल्याळम,बंगाली, गुजराती अशा विविध भाषांमध्ये गाणी गायली होती पण आज मी पण मराठी गाण्यातून पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे. या गाण्यात काम करण्याचा आनंद खूपच चांगला होता. गाणं गाताना मजा आली त्याहून जास्त गाणं शूट करताना आली. या गाण्यात माझा सहकलाकार अभिजीत खांडेकर आहे. अभिजीत माझा चांगला मित्र असून बरेच दिवसांपासून आम्हाला एकत्र काहीतरी काम करायचं होतं आणि तो योग या 'मनमोही' गाण्यानिमित्त जुळून आलाय. यंदाच्या लग्नसराईमध्ये हे गाणं धुमाकूळ घालेल यात शंका नाही".