*स्वामींच्या तारकमंत्राने घडणार मायेचा अलौकिक उद्धार!*
पहा जय जय स्वामी समर्थ दररोज रात्री ८.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर !
*मुंबई ११ फेब्रुवारी, २०२५ :* कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेत सध्या स्वामींच्या तारक मंत्राचा अलौकिक महिमा उलगडतो आहे. मुंबईच्या गोविंद मंत्री यांना स्वामींनी दिलेल्या पादुकांची दिव्य गोष्ट उलगडताना मंत्री यांच्या मुलाचा असाध्य डांग्या खोकला स्वामींनी बरा केला. हि गोष्ट स्वामींच्या अलौकिक धन्वंतरी रूपाने पूर्णत्वाला आली त्याच क्षणाला तारकमंत्राच्या लीला महात्म्याला सुरुवात झाली.याचाच पुढचा टप्पा स्वामींच्या तारकमंत्राने घडणार आहे मायेचा अलौकिक उद्धार येत्या आठवड्यात प्रेक्षकांना पाहता येईल. तेव्हा नक्की बघा जय जय स्वामी समर्थ दररोज रात्री ८.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
तान्ही असताना खंडोबा मंदिरात पायरीपाशी सोडलेल्या अनाथ गौरीच्या, तारकमंत्राने झालेल्या उद्धाराची ही अत्यंत भावनिक गोष्ट आहे, त्याला मायेचा पदर आहे. आता बारा वर्षाच्या असलेल्या या अनाथ गौरीशी प्रचंड गट्टी झालेले स्वामी तिला तारकमंत्र शिकवतात आणि यापुढे कुठलंही काम करत असताना मोठमोठ्याने तारकमंत्राचे उच्चारण करायचे ज्याच्या कानावर पडेल त्या प्रत्येकाचा उद्धार होईल असे सांगतात. तर दुसरीकडे, नर्मदा नामक वेडगळ ठरवून घरातच बंदिवान असलेल्या स्त्रीची सुटकेसाठी झटापट सुरु आहे, आणि ती स्वामींचा धावा करत ‘माझी हरवलेली गोष्ट मला मिळवून द्या, स्वामी’ अशी विंनती करत आहे. तिच्या घराच्या बाजूने गौरी पाणी भरण्यासाठी जात असताना तारकमंत्र म्हणत जाते. हा तारकमंत्र नर्मदाच्या कानावर पडतो आणि या कथानकाला अनपेक्षित कलाटणी मिळते.
नर्मदा आणि गौरीची भेट होणार का ? पुढे काय घडणार ? नर्मदा आणि गौरी मध्ये नक्की काय नाते आहे ? तारकमंत्र म्हणवून घेण्याचे स्वामींचे प्रयोजन काय हे जाणून घेण्यासाठी पहा जय जय स्वामी समर्थ दररोज रात्री ८.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर !