Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*अप्पी- अर्जुनवर GG नावाचं नवं संकट !*

*अप्पी- अर्जुनवर GG नावाचं नवं संकट !*



'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत अप्पी- अर्जुनावर GG नावच संकट येणार आहे याची चाहूल लागली आहे.  अप्पीला वाटतंय की आता सगळं ठिक आहे. पण अमोलच्या देखभालीवरून रुपाली आणि मोना मध्ये वाद होतो. रुपालीचा आरोप आहे की मोना बेफिकीर आहे, पण मोना हे गैरसमज असल्याचं समजावण्याचा प्रयत्न करते. अप्पीला दोघींमधला तणाव जाणवतो. ती त्यांना एकत्र आणत गैरसमज दूर करते. दरम्यान, अप्पी जेव्हा GG बरोबर बालमजुरी प्रकरणावर भिडते, तेव्हा तो त्या गोष्टीशी कोणताही संबंध नसल्याचा दावा करतो. तो सांगतो की त्याच्या एका माणसाने हे कृत्य केलं आहे आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात मी देत आहे. GG आपलं नाव साफ ठेवत प्रसारमाध्यमांना सांगतो की त्याने पोलिसांना मदत केली आहे. यामुळे अप्पी आणि अर्जुन चिंतेत आहेत. चिंचुके ठामपणे सांगतो की GG सुटता होता कामा नये. अप्पी GG ला सापळ्यात अडकवण्याचा प्लॅन आखते. 



आर्याच्या मदतीने ती एका पत्रकाराला माहिती लीक करते की एक मुलगा GG विरोधात साक्ष देणार आहे आणि त्याला दुसऱ्या ठिकाणी हलवले जाणार आहे. ही बातमी ऐकून GG हादरतो. GG आपल्या गुंडांना त्या मुलाला पोलिसांच्या तावडीतून सोडवण्याचे आदेश देतो. त्या रात्री, गुंड मुलाला सोडवण्यासाठी येतात, पण अप्पी, अर्जुन आणि चिंचुके त्यांना रंगेहाथ पकडतात. दुसरीकडे, घरी मकर संक्रांतीच्या सणाच्या वेळी अप्पी आणि अर्जुन घरी नसल्यामुळे कुटुंबीय काळजीत आहेत. अप्पी आणि अर्जुन पत्रकारासमोर गुन्हेगाराला सादर करतात . GG थक्क होतो. दुसऱ्या दिवशी, अप्पी आणि अर्जुन GG ला अटक करण्यासाठी जातात. GG त्यांच्याविरुद्ध बदला घेण्याची शपथ घेतो. दरम्यान, GG चा गुंड कोर्टात असं काही करतो ज्यांनी सर्व खेळचं उलटा पडतो. आता GG अप्पीचा खेळ कायमचा संपवायचा प्लॅन आखतोय. त्या रात्री, अप्पी बापूला सांगते की आता त्यांचे संघर्ष आणि परीक्षेचा काळ संपला आहे. यावर बापू तिला आठवण करून देतात की परीक्षा कधीच संपत नाही. 

 

*बापूच हे बोलणं नवीन संकटाचा इशारा तर नाही? बघायला विसरू नका सोम- शनि  'अप्पी आमची कलेक्टर' संध्या ६:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.