*स्टार प्रवाहच्या ठरलं तर मग मालिकेत येणार सर्वात मोठं वळण*
*सायली अर्जुनसमोर व्यक्त करणार तिच्या मनातलं प्रेम*
स्टार प्रवाहची ठरलं तर मग मालिका सध्या अतिशय रोमांचक वळणावर येऊन पोहोचली आहे. अर्जुनने सर्वांदेखत सायलीवरच्या प्रेमाची कबुली दिलीय. मात्र मधुभाऊंना दिलेल्या वचनाखातर सायली आपल्या मनातील भावना व्यक्त करु शकली नाही. मात्र ज्या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्र आतुरतेने वाट पहात होता तो क्षण आता आलाय. सायली अर्जुनसमोर तिच्या मनातलं प्रेम व्यक्त करणार आहे.
मालिकेतलं हे सर्वात मोठं वळण आहे. कॉण्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य उघड झाल्यानंतर सुभेदार कुटुंबाने आपली तीव्र नाराजी व्यक्त करुन सायलीला घराबाहेर काढलं. अर्जुनलाही अद्याप त्याच्या कुटुंबियांनी माफ केलेलं नाही. तिकडे मधुभाऊंच्या मनातही अर्जुनविषयी बरेच गैरसमज आहेत. अश्या परिस्थितीत अर्जुन-सायली कसे एकत्र येणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
तेव्हा पाहायला विसरु नका ठरलं तर मग रात्री ८.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.