Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अप्पीच्या अपघातामुळे अमोल, अर्जुन खचून जाणार का ?*

*अप्पीच्या अपघातामुळे अमोल, अर्जुन खचून जाणार का ?*

*अप्पीचा शोध घेण्यात अर्जुन होईल का यशस्वी ?*



अप्पीच संपूर्ण कुटुंब आसगावला पोहोचलंय. अमोलला गावात परतल्याचा खूप आनंद होतोय. तो शेतांमध्ये फिरतो आणि गावातील ओळखीच्या जागांना भेट देतो. मात्र, एका अशुभ घटनेमुळे कुटुंबाची चिंता वाढलेय. अमोलला अप्पीची आठवण येतेय आणि तिच्या विचारात अमोल गुंग आहे. त्याचवेळी, अप्पी फोन करून की ती लवकरच पोहोचत असल्याचं सांगते. अप्पी प्रवासाला निघाल्यावर तिच्या गाडीचा डोंगराळ भागात अपघात होतो, आणि ती खोल दरीत कोसळते. जेव्हा अप्पी वेळेवर पोहोचत नाही, तेव्हा संपूर्ण कुटुंब तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतायत. सगळ्यांना अपघाताबद्दल समजतं, पण ते अमोलला काहीच सांगत नाहीत. अर्जुन घटनास्थळी धावतो, तर कुटुंब अमोलला घेऊन घरी परतते. अपघाताच्या ठिकाणी अर्जुनला कळते की गाडी मोठ्या उंचावरून कोसळली आहे आणि स्फोट झाला आहे. 



ड्रायव्हरचा मृतदेह सापडतो, पण अप्पीचा कुठेही पत्ता लागत नाहीये. हे पाहून अर्जुन खूपच खचतो. अप्पीचा अपघात आणि तिचा शोध सुरू असल्याची बातमी गावभर पसरते आणि अखेर अमोलला ही बातमी समजते. सर्वांना भीती वाटते की अमोल कशा प्रकारे प्रतिक्रिया देईल, पण तो शांतपणे सांगतो की त्याची आई नक्की परतेल. असं बोलताना तो स्वतःला दोष देतो की आसगावला निघताना त्याने तिला सोडून का दिलं. दरम्यान, अर्जुन अप्पीचा शोध घेण्यासाठी रात्रंदिवस झटतोय. सगळं कुटुंब हताश झालं असताना अर्जुन मात्र आशा सोडत नाहीये. कुटुंबाला काळजी आहे की अमोल पुन्हा आजारी पडेल. संपूर्ण कुटुंब अमोलसाठी चिंतेत आहे आणि त्याला शाळेत परत पाठवण्यावर भर देतं, कारण सर्वांना वाटतंय की शाळेत गेल्याने तो हळूहळू सावरू शकेल.  पण शाळेतून अमोलच्या वागणुकीच्या तक्रारी येऊ लागतात, ज्यामुळे अर्जुन अधिक चिंतीत होतो. डॉक्टरही अमोलच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त करतात. अर्जुन अमोलला वचन देतो की तो अप्पीला परत आणेल.


*अर्जुन आपलं वचन पूर्ण करू शकेल? अमोल, अप्पूमाच्या आठवणीत खचून जाईल ? बघायला विसरू नका 'अप्पी आमची कलेक्टर सोम- शनी संध्या ६:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.