*भव्य मंगलकार्यची तयारी सुरु !*
'लक्ष्मी निवास' या महामालिकेत भव्य मंगलकार्यची जय्यत तयारी सुरु झाली आहे. जयंत आणि जान्हवी कुटुंबासोबत पूजा पार पाडतात, तर दुसऱ्या बाजूला सिद्धूही भावनासाठी पूजा करतो. लक्ष्मी हुशारीने रवी आणि सुपर्णाला आनंदीला भावनाकडे द्यायला सांगते. आनंदीला घरी घेऊन आल्यावर संतोष भावनासोबत वाद घालतो, पण लक्ष्मी आणि श्रीनिवासचा भावनाला संपूर्ण सपोर्ट आहे. इकडे सिद्धू आईने सुचवलेल्या मुलींना नाकारतोय.
तेवढ्यात त्याला भावनाकडून फोन येतो, आणि ती त्याचे आभार मानते. जयंत आणि श्रीनिवास एकमेकांना लग्नाची पत्रिका देतात. जान्हवी आपल्या लग्नाची पत्रिका विश्वाला पोहोचण्याचा प्रयत्न करते, पण तो तिला प्रतिसाद देत नाहीये. लक्ष्मी सिद्धूलादेखील लग्नाचं आमंत्रण देते. लक्ष्मी जान्हवीच्या लग्नाची काळजी आहे. पण श्रीनिवास तिला शांत करत धीर देतो. सगळे जयंत आणि जान्हवीच्या लग्नासाठी निघताना भावुक होतात.
*जान्हवी आणि जयंतच्या भव्य मंगलकार्यसाठी तुम्ही सगळे ही तयार व्हा कारण ह्या महापालिकेत आता खूप काही घडणार आहे. तेव्हा बघायला विसरू नका 'लक्ष्मी निवास' दररोज रात्री ८ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.*