“YRF स्पाय युनिव्हर्सची सर्वात लहान वयाची स्पाई होणे म्हणजे स्वप्नांच्या पलीकडचं यश!” - शर्वरी
2024 हे शर्वरीसाठी निर्णायक वर्ष ठरलं आहे. तिने स्वतःला बॉलिवूडची नवीन 'इट-गर्ल' म्हणून सिद्ध केलं आहे। 100 कोटींची ब्लॉकबस्टर ‘मूंजा’, ग्लोबल स्ट्रीमिंग हिट ‘महाराज’, आणि अॅक्शन-थ्रिलर ‘वेदा’ नंतर शर्वरी आता तिच्या सर्वात मोठ्या प्रोजेक्टसाठी – YRF स्पाय युनिव्हर्सच्या ‘अल्फा’ साठी सज्ज आहे।
YRF स्पाय युनिव्हर्स ची सर्वात लहान वयाची गुप्तहेर बनण्याबद्दल शर्वरी खूप आनंदी आहे।
ती म्हणते, “प्रामाणिकपणे सांगायचं तर मला याची जाणीवसुद्धा नुकतीच झाली, जेव्हा मी मूंजा च्या 100 कोटींच्या यशानंतरच्या मुलाखती देत होते आणि मला याबद्दल सांगण्यात आलं! YRF स्पाय युनिव्हर्सची सर्वात लहान वयाची गुप्तहेर होणे हे स्वप्नांच्या पलीकडचं यश आहे – ही एक जबाबदारी आहे आणि एक विलक्षण संधी देखील। मी नेहमीच या ब्लॉकबस्टर चित्रपटांची आणि त्या युनिव्हर्समध्ये झळकणाऱ्या जबरदस्त सुपरस्टार्स ची फॅन राहिले आहे। या वारशाचा भाग होणं माझ्यासाठी खूपच खास आहे। YRF स्पाय युनिव्हर्स ची यशाची टक्केवारी 100% आहे, आणि मला आशा आहे की ‘अल्फा’ हे यश पुढे नेईल आणि प्रेक्षकांना एक अविस्मरणीय अनुभव देईल! मी आदित्य सरांची खूप आभारी आहे की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला। तसेच माझ्या दिग्दर्शक शिव रवैल यांचीही आभारी आहे, ज्यांनी मला त्यांची कल्पना साकार करण्यासाठी सक्षम मानलं।”
‘अल्फा’, ज्याचं दिग्दर्शन ‘द रेल्वे मॅन’ फेम शिव रवैल करत आहेत, 25 डिसेंबर 2025 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल। शर्वरीचा ‘गर्ल-नेक्स्ट-डोअर’ पासून बॉलिवूडच्या अॅक्शन स्टारपर्यंतचा प्रवास खरंच प्रेरणादायक आहे!