आयुष्मान खुराणाने सुरू केली ‘थामा’ची शूटिंग, दिनेश विजान म्हणाले - ‘थामा साकारण्यासाठी आयुष्मानपेक्षा चांगला कोण!’
मॅडॉक फिल्म्सने नुकतीच त्यांच्या हॉरर-कॉमेडी युनिव्हर्समधील पुढील धमाकेदार चित्रपटाची घोषणा केली आहे – ‘थामा’. ही रक्तरंजित प्रेमकथा आहे, ज्यामध्ये आयुष्मान खुराणा आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकांमध्ये दिसतील.
आज आयुष्मानने ‘थामा’च्या शूटिंगला सुरुवात केली. या खास प्रसंगी निर्माते दिनेश विजान यांनी त्याला एक पत्र पाठवले, ज्यात लिहिले होते, “मॅडॉकच्या हॉरर-कॉमेडी युनिव्हर्समध्ये तुमचं स्वागत आहे. ‘अनडेड’ थामा साकारण्यासाठी आयुष्मानपेक्षा चांगला अभिनेता असूच शकत नाही! आम्हाला खात्री आहे की तुम्हाला या भूमिकेत काम करताना खूप मजा येईल.”
‘थामा’ एक रोमांचक प्रेमकथा सादर करणार आहे, जिथे प्रेम आणि रक्तरंजित थरार एकत्र दिसणार आहे. हा चित्रपट दिवाळी 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आयुष्मान खुराणा आणि रश्मिका मंदानासोबत परेश रावल आणि नवाजुद्दीन सिद्दीकीसारखे प्रतिभावान कलाकारही या चित्रपटाचा भाग असतील. ब्लॉकबस्टर ‘मूंजा’ फेम दिग्दर्शक आदित्य सर्पोतदार हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. कथा निरेन भट्ट, सुरेश मॅथ्यू आणि अरुण फुलारा यांनी लिहिली आहे, तर दिनेश विजान आणि अमर कौशिक या चित्रपटाचे निर्माते आहेत.