बजरंगच्या बंडखोरीने अक्षरा आणि अधिपतीमध्ये होणार मोठा वाद !
'तुला शिकविन चांगलाच धडा' मध्ये अक्षरा आणि बजरंग यांच्यातील संघर्ष आता एका रोमांचक वळणावर पोहोचला आहे. अक्षरा, भुवनेश्वरीच्या गूढ चेहेऱ्यामागचा पर्दाफाश करण्यासाठी आणि तिला खोटी ठरवण्यासाठी, बजरंगला अधिपतीसमोर उभं करते. बजरंगने अक्षराला दिलेल्या वचनानुसार, त्याला भुवनेश्वरीचा खरा चेहरा उघड करायचा होता. पण, चकित करणारी गोष्ट म्हणजे बजरंग अधिपतीसमोर भुवनेश्वरीची बाजू घेतो ! अक्षरा या विश्वासघातामुळे गडबडलेली आहे, पण बजरंग पुढे जाऊन अजून एक धक्कादायक खुलासा करतो. अक्षरानेच त्याला भुवनेश्वरीविरुद्ध बोलायला सांगितल्याचं अधिपतीला सांगतो आणि त्या बदल्यात अक्षराने त्याला पैसे दिल्याचं उघड करतो. यामुळे अधिपती आणि अक्षरामध्ये मोठा वाद होणार आहे.
तेव्हा पाहायला विसरू नका 'तुला शिकविन चांगलाच धडा' दररोज रात्री 8 वा. फक्त आपल्या झी मराठीवर.