"लक्ष्मी या भूमिकेसाठी मी खूप वर्षांनी, ऑडिशन, मोक शूट हे सगळं केले"- हर्षदा खानविलकर
"लक्ष्मी निवास" मालिकेतून आणखीन एक चेहरा अनेक वर्षांनंतर झी मराठीवर पुनरागमन करत आहे. हर्षदा खानविलकर झी मराठीवर एक कधी ना पाहिलेल्या भूमिकेत दिसणार आहे. हर्षदानि, आपल्या या वेगळ्या भूमिके बद्दल बोलताना म्हंटले, "माझ्या भूमिकेचं नाव लक्ष्मी आहे. ती एक मध्यमवर्गीय कुटुंबातली गृहिणी आहे. या भूमिकेची एक सुंदरता आहे जी तुमच्या- माझ्या आई मध्ये आहे ती म्हणजे कुटुंबावर निस्वार्थ आणि समान प्रेम करणं. लक्ष्मीसाठी तिचा पती श्रीनिवास, मुलं, सुना आणि नातवंड हे तिच्यासाठी पहिले येतात. मालिका जशी सुरु होते तेव्हा पासूनच तुम्हाला बघायला मिळेल कि तिचं पाहिलं प्राधान्य आहे तिच्या दोन अविवाहित मुलींचे लग्न व्यवस्थित पार पाडणं, त्यांचे सुखाचे संसार बघणं. मी अनेक व्यक्तीरेखा करत आली आहे, ज्या विशिष्ठ धाटणीच्या आणि करारी व्यक्तिमत्वाच्या होत्या. मी खूप मॅनिफेस्ट करत होते की एखादी सोज्वळ, तुमच्या-आमच्यातली, असं स्त्री पात्र मला करायला मिळेल का. 'लक्ष्मी निवास' मालिकेबद्दल मी सहज बोलू शकते की "कायनात ने मेरी मदत कि हैं, माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी". मी खूप वर्षांनी, खास या भूमिकेसाठी ऑडिशन, मोक शूट हे सगळं केलं.
खरं सांगायचं तर आय टेस्टेड फॉर 'लक्ष्मी निवास' आणि माझी निवड झाली. मी जेव्हा लक्ष्मीसाठी मोक शूट केलं मला माझ्या शंका होत्या, म्हणजे मी असं नाही म्हणणार कि मी कमाल ऑडिशन दिलं, कारण कास्टिंग हा कुठच्याही प्रोजेक्टसाठी खूप महत्वाचा भाग असतो. झी मराठीने ती हिम्मत केली आहे कारण जेव्हा मला कळले कि मी फायनल झाली आहे मला थोडावेळ लागला त्यावर विश्वास ठेवायला. माझ्यासाठी मी लक्ष्मी साकारणार ही बातमी खूप आनंद घेऊन आली आणि सरप्राईज सुद्धा. ही मालिका खूप गोष्टींसाठी पायोनियर बनणार आहे. ही फक्त एक मोठया कुटुंबाची गोष्ट नाही तर ही एक खूप मोठी मालिका आहे. कारण लक्ष्मी आणि श्रीनिवासच जे कुटुंब आहे ते आहेच १०-१२ सदस्यांचा. या पलीकडे आणखीन २ कुटुंब आहेत ती ही तितकीच महत्वाची आहेत. अनेक पात्रांची मिळून ही एक गोष्ट असणार आहे जी बघायला तुम्हाला नक्की मज्जा येईल. मी आणि तुषार दळवी खूप वर्षापासून एकमेकांना ओळखतो. मी एका मालिकेची निर्माती होती त्यात तुषार दादाने काम केलं होत. पण इतक्या वर्षांमध्ये कधी सहकलाकार म्हणून काम करण्याचा योग्य आला नव्हता पण 'लक्ष्मी निवास' मुळे तो योग जुळून आला आहे. अत्यंत उत्तम कलाकार आहे तुषार दादा आणि त्याच्या सोबत काम करताना मला खूप काही शिकायला मिळतंय. खूप सहज पणे तो काम करतो. मी अक्षयाला काही काळापासून ओळखते आणि माझ्या मते अक्षयाचा चेहरा इंडियन टेलिव्हिजन मधला वन ऑफ द मोस्ट ब्युटीफुल चेहरा आहे. तिच्या बरोबर आणि आमचं जे पूर्ण लक्ष्मी निवासच कुटुंब आहे त्यांच्या सर्वांसोबत रोज काम करण्याची उत्सुकता आहे. लक्ष्मीच्या लुक बद्दल सांगायचं झाले तर मला आवडत प्रत्येक भूमिकेचा विशिष्ठ असा लुक असावा आणि माझ्या प्रेक्षकांनी माझ्या प्रत्येक लुकवर प्रेमही केले आहे. मला असं वाटतंय लक्ष्मीचा लुक सुद्धा प्रेक्षकांसाठी सर्प्राइजिंग असू शकतो आणि मी अपेक्षा करतेय कि तुम्हा सर्वाना लक्ष्मीचा लुक भावेल. मी २०१० मध्ये झी मराठीवर "माझिया प्रियाला प्रीत कळेना" मालिका केली होती. आता १२-१३ वर्षांनी पुनरागमन होत आहे. खूप उत्सुक आहे आणि एका वेगळ्या धाटणीच्या भूमिकेत दिसणार आहे. झी मराठीने मला जी संधी दिली आहे अपेक्षा आहे कि मी त्याच सोनं करेन. मला वाटत प्रत्येक मालिका तुम्हाला काहींना काहीतरी देऊन जाते. ही मालिका एकत्र कुटुंब पद्धतीला समर्थन देणारी मालिका आहे आणि त्याच सोबत जे वैश्विक सत्य आहे कि प्रत्येक व्यक्तींनी नाती जपणं गरजेचं आहे, कारण माणसंच माणसाच्या कामाला येतात. आपलं कुटुंबच आहे जे कोणत्याही परिस्थितीत खंबीरपणे आपल्या पाठीशी उभं रहात. माणसांनी, माणसाला महत्व दिले पाहिजे हे ही मालिका खूप अधोरेखित करते. प्रत्येक माणूस आयुष्याच्या कोणत्यानाकोणत्या टप्प्यावर एक स्वप्न पाहतो आणि ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपल्या माणसांची साथ लागतेच ह्याची जाणिव करून देईल ही गोष्ट. "
तेव्हा पाहायला विसरू नका नवीकोरी मालिका "लक्ष्मी निवास" २३ डिसेंबरपासून दररोज रात्री ८ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.