Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*झी स्टुडिओज' सादर करीत आहेत, आता थांबायचं नाय!*

*झी स्टुडिओज' सादर करीत आहेत, आता थांबायचं नाय!*

*'झी स्टुडिओज', 'चॉक अँड चीज' आणि 'फिल्म जॅझ' प्रॉडक्शन यांची एकत्र निर्मिती!*



*मुंबई* : बृहन्मुंबई महानगरपालिका, आशियामधील सर्वात श्रीमंत समजली जाणारी भारतातील मानाची महानगरपालिका, याच बीएमसीच्या सहकार्याने आणि प्रेरणेने तयार होत आहे, 'झी स्टुडिओज'चा आगामी मराठी चित्रपट, 'आता थांबायचं नाय'!

'झी स्टुडिओज', 'चॉक अँड चीज' आणि 'फिल्म जॅझ' प्रॉडक्शनची एकत्र निर्मिती असलेल्या 'आता थांबायचं नाय' या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे, शिवराज वायचळने. 

सोबतच लोकप्रिय अभिनेते भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, ओम भुतकर, श्रीकांत यादव, पर्ण पेठे, प्रवीणकुमार डाळिंबकर, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे आणि आशुतोष गोवारीकरअशी तगडी स्टारकास्ट सिनेमात आहे. पहिल्यांदाच हे सर्व दिग्गज कलाकार एकत्र आल्याने या चित्रपटाची कथा काय असणार याचं औत्सुक्य प्रेक्षकांमध्ये नक्कीच असणार आहे. हृदयाला भिडणाऱ्या अद्वितीय प्रेरणादायी कथेच्या दर्जेदार सादरीकरणासाठी तसेच निर्मितीसाठी चित्रपट निर्मिती क्षेत्रातील लोकप्रिय आणि विश्वसनीय 'झी स्टुडिओज' ही संस्था पुढे आली असून त्यांच्यासोबत हिंदी चित्रपट क्षेत्रातील नावाजलेले निर्माते निधी परमार-हिरानंदानी, धरम वालीया ही धुरा उत्तम निभावत आहेत, या निर्मितीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. तसेच “श्रीकांत” फेम तुषार हिरानंदानी हे या सिनेमासाठी क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणून काम पाहत आहेत, .


आज 'आता थांबायचं नाय' या सिनेमाचा मुंबई महानगर पालिका आयुक्त माननीय भूषण गगराणी, किरण दिघावकर महापालिका उपायुक्त, झी स्टुडिओजचे चिफ बिझनेस ऑफिसर उमेश के बन्सल, झी स्टुडिओजचे बिझनेस हेड बवेश जानवलेकर, निर्माते निधी परमार - हिरानंदानी, धरम वालीया, क्रिएटिव्ह प्रोड्युसर तुषार हिरानंदानी, निवृत्त सनदी मनपा अधिकारी उदयकुमार शिरुरकर या खास मान्यवरांसह चित्रपटातील मुख्य कलाकार तंत्रज्ञाच्या उपस्थितीत ग्रांट रोड येथील गिल्डर टँक महापालिकेच्या शाळेत मुहुर्त संपन्न झाल्यानंतर लगेचच चित्रीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. मराठी चित्रपटविश्वात एका कर्तबगार आणि संवेदनशील अधिकाऱ्यासंबंधीची ही सत्यकथा नक्कीच वेगळी ठरेल.


“मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात तेजाचा किरण आणणाऱ्या एका व्यक्तिमत्त्वाचा प्रवास मांडण्याची संधी मिळणं, ही गोष्ट 'झी स्टुडिओज'साठी अत्यंत भाग्याची आहे. मराठीत येणारा एक वेगळा आणि प्रेरणादायी सिनेमा पाहणं, ही एक पर्वणीच ठरणार आहे.”

*-  उमेश के बन्सल, चिफ बिझनेस ऑफिसर, झी स्टुडिओज*



“मुंबई महानगरपालिकेमधल्या कर्तबगार कर्मचाऱ्यांच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा सिनेमा एका सत्यघटनेवर आधारित आहे. मात्र ही घटना अत्यंत प्रेरणादायी असून, मराठीत पहिल्यांदाच अशाप्रकारची मांडणी केली जाणार आहे. मुंबई महापालिकेने या चित्रपटासाठी जे सहकार्य दिलं आहे, त्यासाठी एक मुंबईकर आणि सिनेव्यवसायिक म्हणून आम्ही नक्कीच आभारी आहोत.”

*- बवेश जानवलेकर, बिझनेस हेड, झी स्टुडिओ* 


"साधारण शासन असेल किंवा महापालिका असेल नेहमी काय केलं जात नाही या टीकेला आम्हाला दैंनदिन सामोरं जावं लागतं. महापालिकेत म्हणा, शासनात म्हणा अनेक चांगले उपक्रम चालू असतात, चांगले अधिकारी असतात ते चांगली कामे करीत असतात. त्याच्या नोंदी बऱ्याच वेळा घेतल्या जात नाहीत किंवा घेतल्या तर त्यात काही त्रुटी राहतात. म्हणूनच या चित्रपटाच्या माध्यमातून चांगला उपक्रम आपल्यासमोर येतोय. अश्या प्रकारे या कामांची नोंद कायमस्वरूपी घेतली जाईल आणि लोकांपर्यंत पोहचण्यास मदत होईल. म्हणूनच  मला महापालिकेच्या वतीने आनंद व्यक्त करावासा वाटतोय. मी सर्वांचे अभिनंदन करतो."

*भूषम गगराणी - बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त *


“प्रशासकीय अधिकारी म्हणून काम पाहताना कायमच नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचबरोबर आमच्या कर्मचाऱ्यांचीही प्रगती व्हावी, असा विचार मनात आला आणि त्यावर अंमलबजावणीही केली. हा प्रवास आता चित्रपटातून मांडला जाणार आहे. अधिकारी म्हणून काम करताना जे आनंदाचे आणि समाधानाचे क्षण असतात त्यातला एक क्षण आता या सिनेमाद्वारे कायमचा आठवणीत राहणार आहे.”

*- उदयकुमार शिरुरकर, निवृत्त सनदी अधिकारी*

*चित्रपट - 'आता थांबायचं नाय'* 

दिग्दर्शक - शिवराज वायचळ

निर्माते : 

झी स्टुडिओज - उमेश के बन्सल आणि बवेश जानवलेकर

चॉक अँड चीज प्रॉडक्शन - निधी परमार – हिरानंदानी

क्रिएटिव्ह प्रोड्युसर - तुषार हिरानंदानी

फिल्म जॅझ - धरम वालीया

लेखक - शिवराज वायचळ, ओमकार गोखले आणि अरविंद जगताप  

कलाकार - भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, ओम भुतकर, श्रीकांत यादव, पर्ण पेठे, प्रवीणकुमार डाळिंबकर, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे 

आणि आशुतोष गोवारीकर


आपल्या चॅनेलसाठी व्हिडीओ बाईट्स - व्हिडीओ डाउनलोड करण्यासाठी wetransfer लिंक


Download link

https://wetransfer.com/downloads/740cd5c678853b74d8925bc0ec0fb06320241216181422/082ff15dc51f415866dc797b8611122d20241216181447/e76500?t_exp=1734632062&t_lsid=0884f58f-03fe-4df6-9d53-007a7386ab3b&t_network=email&t_rid=ZW1haWx8Njc2MDZlMDNkODI3Zjg0MWYyNzg4ODNm&t_s=download_link&t_ts=1734372887



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.