Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

थम्‍स अपने अल्‍लु अर्जुनसोबत वर्षातील सर्वात एपिक सहयोग केला

 थम्‍स अपने अल्‍लु अर्जुनसोबत वर्षातील सर्वात एपिक सहयोग केला 


नवी दिल्‍ली, ८ नोव्‍हेंबर २०२४: थम्‍स अप या साहसी तूफानी उत्‍साहाशी संलग्‍न असलेल्‍या भारतातील आयकॉनिक स्‍वदेशी ब्रँडने उत्‍साहवर्धक टीझर लाँच केला आहे, ज्‍यामध्‍ये अल्‍लु अर्जुन आहेत. या साहसी पुढाकारासह ब्रँडने उत्‍साहासोबत चाहत्‍यांमध्‍ये टीझरमध्‍ये पाहायला मिळणाऱ्या गोष्टीबाबत उत्‍सुकता निर्माण केली आहे. चित्रपट ‘पुष्‍पा २'चा बहुप्रतिक्षित ट्रेलरच्‍या आधारावर हा टीझर लाँच करण्‍यात आला आहे, ज्‍यामधून थम्‍स अप या चित्रपटाच्‍या उत्‍साहवर्धक रोमांचसह बजावणाऱ्या भूमिकेबाबत उत्‍सुकता निर्माण झाली आहे.

 


हा टीझर अल्‍लु अर्जुन यांच्‍या मोठ्या चाहत्‍यावर्गाला प्रकाशझोतात आणत नीडर व साहसी उत्‍साहाशी संलग्‍न असलेल्‍या ग्राहकांसोबत थम्‍सच्‍या नातेसंबंधाला दृढ देखील करतो. कोका-कोला इंडिया व साऊथवेस्‍ट एशियाच्‍या स्‍पार्कलिंग फ्लेवर्सच्‍या कॅटेगरी हेड सुमेली चॅटर्जी म्‍हणाल्‍या, “आम्‍ही सतत गाथा रचत आहोत, ज्‍या आमच्‍या चाहत्‍यांमध्‍ये उत्‍सुकता निर्माण करतात आणि थम्‍स अपच्‍या मोहिमा अगदी वेळेवर परिपूर्ण रोमांचचा अनुभव देत आहेत. नवीन सहयोग करायचा असो किंवा चाहत्‍यांच्‍या आवडत्‍या क्षणांशी संलग्‍न व्हायचे असो आम्‍ही ग्राहकांना साहसी व संस्‍मरणीय अनुभव देतो. अल्‍लु अर्जुन यांच्‍यासोबतचा हा प्रवास एका नवीन अध्यायापेक्षा अधिक आहे, म्‍हणून आमच्‍याशी संलग्‍न राहा, जेथे बरेच काही अनुभवायला मिळणार आहे.''  

 

सर्वत्र उत्‍सुकता निर्माण झाली असताना थम्‍स अप मनाला आनंद देणारा अनुभव देण्‍यास सज्‍ज आहे, जो त्‍यांच्‍या साहसी व धाडसी उत्‍साहाच्‍या पैलूंना कॅप्‍चर करतो.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.