मानाचा अ. भा.म.नाटय परिषद तर्फे गणेश तळेकर " कार्यकर्ता पुरस्काराने " सन्मानित
June 16, 2024
0
एक असा कार्यकर्ता , जो नाट्यभूमीशी निस्वार्थी सेवा करतो....त्याना आज मानाचा अ. भा.म.नाटय परिषद तर्फे कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले...
अनेक वर्षे नाटकक्षेत्रात काम करत आहे ,अनेक वर्षे नाटय व्यवस्थापक म्हणून काम करत आहे, अनेक इव्हेंट करत आहे, निस्वार्थीपणे सेवा करत आहे, या आनंदात आणखीन एक भर पडली आहे अखिल भारतीय नाट्य परिषद तर्फे " लीला मेहता पुरस्कृत भार्गवराव पांगे कार्यकर्ता पुरस्कार " , मध्यवर्ती ,मुंबई कार्यालयात निस्वार्थीपणे कार्य केल्याबद्दल शुक्रवार ,दिनांक : १४ जून २०२४ रोजी सन्मानपूर्वक गणेश तळेकर यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार महाराष्ट्राचे अत्यंत लाडके अभिनेते महाराष्ट्र भूषण श्री अशोक सराफ सर आणि दिग्गज दिग्दर्शक व शंभराव्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल सर यांच्या हस्ते मिळाल्याने गणेश तळेकर यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस होता . त्यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना गणेश तळेकर खूप भारावून गेले. महाराष्ट्राचे लाडके नेते माननीय श्री. शरद पवार साहेब.. उद्योग मंत्री श्री. उदय सामंत साहेब.. माननीय श्री. शशी प्रभू साहेब , जेष्ठ अभिनेत्री रोहिणी ताई हट्टंगडी... दिग्गज अभिनेते निर्माते व अध्यक्ष श्री. प्रशांत दामले सर, श्री. अशोक हांडे सर, माझी नाटय परिषद अध्यक्ष , श्री मोहन जोशी, श्री सतीश लोटके सर , श्री शिवाजी शिंदे सर , पदाधिकारी , सभासद आणि नाटक अखिल भारतीय नाट्य परिषदेचे गणेश तळेकर यांनी मनापासून आभार मानले.
सर्व सहकलाकार तंत्रज्ञ व बॅकस्टेजच्या संपूर्ण टीमचा गणेश तळेकर हे अत्यंत ऋणी आहेत. या साऱ्यांमुळे.. त्यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्यामुळेच हा पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार मिळणे ही आपल्या कामाची पावती तर आहेच, पण त्याचबरोबर जबाबदारीची जाणीवही करून देते. यापुढे मी रंगभूमीची सेवा करताना अशाच चांगल्या प्रकारे काम करत राहण्याचा मी मनापासून आयुष्यभर प्रयत्न करत राहीन. पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार आणि असाच आशिर्वाद प्रेम कायम माझ्या पाठीशी राहू दे असे गणेश तळेकर यांनी सांगितले......🙏☺️