Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मंगलमय दिनानिमित्त मंगळवारी काव्यसंग्रह कवियत्री च्या " चाहुलखुणा... "

मंगलमय दिनानिमित्त मंगळवारी काव्यसंग्रह कवियत्री च्या " चाहुलखुणा... "
मंगळवार दिनांक :- ११ - ६ - २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता कार्यक्रम सुरू झाला, जशी पावसाची चाहुल लागते , येणाऱ्या नव्या बाळाची चाहुल लागते , तशीच आज एका अत्तरामध्ये व अक्षरामध्ये जन्म घेणाऱ्या या एका नव्या कवयित्रीच्या " चाहुलखुणा " आता आपल्या साहित्यक्षेत्राला लाभल्या आहेत , चला तर मग त्याचे या नव्या प्रवासात स्वागत करूया...! आज प्रज्ञा पळसुले यांच्या नव्या काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा डोंबिवली येथे गणेश मंदिर , विनायक हॉल येथे संपन्न झाला...!
या प्रसंगी प्रसिद्ध लोककवी प्रशांत मोरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले , अध्यक्ष डॉ.गिरीश लटके , प्रमुख अतिथी डॉ.संगीता गोडबोले , डॉ.नंदकुमार सावंत , श्रीमती राजेश्री पोतदार , श्री रविकिरण पराडकर हे मान्यवर उपस्थित होते, सुत्र संचालन - अभिनेते श्री मकरंद पाध्ये यांनी कवितेच्या माध्यमातून रसिक जणांचे मने जिंकले . या कार्यक्रमाला अनेक मान्यवर व साहित्यिक , रसिक यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती , अनेक मान्यवर कवींनी आपले मनोगत व्यक्त करत रसिकांची सुध्दा मने जिंकली.. ! रसिकांसाठी " चाहूलखुणा" हे ऑनलाईन विक्रीस लवकरच येतंय...

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.