*कोण आहे 'पुन्हा कर्तव्य आहेच्या' सेटवर अक्षयाचे अन्नदाते ?*
April 26, 2024
0
*कोण आहे 'पुन्हा कर्तव्य आहेच्या' सेटवर अक्षयाचे अन्नदाते ?*
मालिकांच्या शूट शेड्युल असं असत की कलाकार घरापेक्षा जास्त वेळ सेटवर घालवतो. हे सर्व कलाकार एकत्र शूट करतात , हसतात , खेळतात , एकत्र जेवतात एकमेकांची एखाद्या परिवारासारखी काळजी घेतात. 'पुन्हा कर्तव्य आहे मध्ये वसुंधरेची भूमिका साकारत असलेली अक्षया हिंदाळकरला ही सेट वर आपली माणसं मिळाली आहेत. घरापासून शूट लोकेशन दूर असल्यामुळे अक्षयाला घरातून जेवणाचा डब्बा नेहमी आणण शक्य होत नाही. अश्यावेळी सेटवर तिचे अन्नदाता तिची काळजी घेतात असं अक्षयाने आपल्या सेटवरच्या अन्नदातां बद्दल बोलताना सांगितले, "मी नवी मुंबईला राहते म्हणून घरातून जेवण आणणे खूप क्वचितच होतं जेव्हा सुट्टी असते किंवा लेटचा कॉल टाइम असेल तेव्हा मी घरातून डब्बा घेऊन येते.
पण जर माझा डब्बा नसेल तर मालिकेत माझी आई शमा निनावणेकर आणि अक्षय हे दोघे घरातून डब्बा आणतात. हे दोघे ही माझे अन्नपूर्णा आहेत. ते नेहमी माझ्यासाठी ही डब्बा आणतात आणि तो मी खाते. मला खूप छान वाटतं की माझ्या वाटणीच ही ते जेवण घेऊन येतात."
'पुन्हा कर्तव्य आहे' दररोज रात्री ९:३० वा. फक्त झी मराठीवर.