निशी - नीराजच्या लग्नात निशीचा खास लुक.
April 26, 2024
0
*निशी - नीराजच्या लग्नात निशीचा खास लुक.*
*निशी- नीराजच्या लग्नात श्रीनुचे वाजले १२*
'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत निशी- नीराजचा लग्न सोहळ्याची लगबग सूर आहे. ह्यावेळी निशी खूप आनंदात आहे तिला जसे हवे होते तसं तिचं लग्न होत आहे. निशी म्हणजेच दक्षता जोईलने आपल्या ह्या लुक बद्दल बोलताना सांगितले, " तर फायनली निशीला जसं हवं होतं तसं लग्न होतं आहे म्हणून निशी खूप खुश आहे. गेल्यावेळी निशीचा लुकमध्ये खूप साधेपण होता आणि त्या लुकच्या ही प्रतिक्रिया खूप छान मिळाल्या होत्या. म्हणून तो फील न सोडता कोकणातला टच देऊन फ्रेश रंग आणि साडीची स्टाईल ठेवली आहे. मेकअप अगदी सुद्धा सिम्पल पण चांगला दिसेल असा ठेवला आहे. अपेक्षा आहे की प्रेक्षकांना हा ही लुक आवडेल." पण ह्या लग्नात असा कोणतरी आहे ज्याच्या चेहऱ्यावर १२ वाजले आहेत कारण त्याच्या लग्नाचा विचार खोत कुटुंब करत आहे आणि श्रीनुची वधू म्हणून ते चारूचा विचार करत आहे.
श्रीनुच्या हृदयात ओवी आहे ह्याची कल्पना खोत कुटुंबाला नाही. पण चारूच्या मनात श्रीनू भरलाय ती मंजूशी बोलताना सतत त्याचा उल्लेख करते. दादाखोत सुद्धा चारूसाठी स्थळं बघत आहेत. सुरुवातीला चारूच्या वागण्याकडे फारसं लक्ष न देणारा श्रीनू आता सावध राहत आहे. त्यातून लाली सुद्धा मुद्दाम काही गोष्टी घडवून आणण्यासाठी धडपडते आहे. अशातच ओवीचा वाढदिवस ही आहे. चारुला एव्हाना दोघांच्या प्रेमाची कुणकुण लागलेली आहे. त्यामुळे ओवीचा वाढदिवस श्रीनूला साजरा करता नाही याच्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. हे सर्व चालू असताना दुसरीकडे निशी आणि नीराजच्या लग्न विधी सुरु आहेत. खूप काळानंतर घरात एक मंगल कार्य पार पडत आहे म्हणून सगळे आनंदात आहेत.
तर ह्या सगळ्या गोंधळात श्रीनु ओवीचा वाढदिवस साजरा करू शकेल का? बघायला विसरू नका 'सारं काही तिच्यासाठी' दररोज रात्री ८:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.