रश्मिका सांगतेय फील गुड विथ फियामा आणि माईंड्स फाऊन्डेशन सोबत
April 14, 2024
0
रश्मिका सांगतेय फील गुड विथ फियामा आणि माईंड्स फाऊन्डेशन सोबत
नवीन फोमो, फन ऑफ मिसिंग आऊट ! - आयटीसी फियामा मेंटल वेलबीईंग सर्व्हेचा निष्कर्श
फन ऑफ मिसिंग आऊट : ६७ टक्के भारतीय जेन-झी ने बदलला फोमो आणि मानसिक आरोग्याच्या संदर्भातील दृष्टिकोन
तणाव आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी ८६ टक्के भारतीयांनी केली संगीताची निवड
तणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी ८६ टक्के भारतीयांनी केली योग,ध्यानधारणा आणि व्यायामाची निवड
आनंद मिळवण्यासाठी ७५ टक्के जेन-झी भारतीयांनी पाहिली पिक मी अप सिरीज
राष्ट्रीय ९ एप्रिल २०२४ - भारतात मानसिक आरोग्या विषयीचा लोकांचा दृष्टिकोन वेगाने बदलत असून याबाबत जागरुकता ही वाढत आहे, त्याच बरोबर या समस्ये विषयी असलेला सामाजिक दृष्टिकोनही बदलत आहे. फील गुड विथ फियामा मेंटल वेल बिईंग सर्व्हे २०२३ च्या माध्यमातून जेन-झीने आनंदी मानसिकता जोपासण्यासाठी आणि आनंदाचा अनुभव घेण्यासाठी काय उपाय केले या विषयावर प्रकाश टाकण्यात आला. नेल्सनआयक्यू ने हे सर्वेक्षण केले होते आणि यातून अधिकतर जेन झी आणि मिलेनियल्स कशा प्रकारे आपली वागणूक आणि तणाव याविषयी माहिती घेऊन आनंदी आणि शांत राहण्यासाठी काय करतात याची माहिती घेण्यात आली.
सामाजिक कार्यक्रम आणि उपक्रमांच्या ‘फिअर ऑफ मिसिंग आऊट’ च्या अगदी विरुध्द जेन झी फोमो विषयी नवीन दृष्टिकोन म्हणजेच ‘फन ऑफ मिसिंग आऊट’ असा दृष्टिकोन ठेवतात. दृष्टिकोनातील हा बदल प्रत्येक व्यक्तीला नवीन सीमारेषा आखणे, तंदुरुस्तीला प्राधान्य देणे आणि तुम्हाला ज्या गोष्टींनी आनंद आणि पूर्णत्व मिळते हे दर्शवते. सर्वेक्षणातून असे दिसून येते की तणाव आणि काळजी असूनही ५१ टक्के भारतीयांच्या मते समाजमाध्यमांचा सकारात्मक परिणाम होऊन ते ऑनलाईन काऊन्सेलिंगचा पर्याय निवडू शकतात. योगा, ध्यानधारणा आणि व्यायाम या गोष्टींचा उपयोग ८६ टक्के भारतीय करतात ज्यामुळे त्यांच्या तणावावर ते मात करु शकतात यातून असे दिसून येते की त्यांनी मानसिक आरोग्याचा समतोल ठेवण्यासाठी शारीरीक कामाची निवड केली आहे. ७५ टक्के भारतीय जेन झी हे आनंदी राहण्यासाठी पिक मी अप सिरीज किंवा आनंदी ठेवणारा चित्रपट पाहतात.