Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वनच्या मंचावरचा भाऊक क्षण

मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वनच्या मंचावरचा भाऊक क्षण नृत्यदिग्दर्शिका आणि कॅप्टन फुलवा खामकरने आपल्या गुरुंनी दिलेले खास घुंगरु रुचिता-सिद्धेश या स्पर्धकांना दिले भेट
स्टार प्रवाहवरील मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन या कार्यक्रमाला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. नृत्यासोबतच नात्यांचा गोडवा या कार्यक्रमातून अनुभवायला मिळत आहे. या मंचावर आपली कला सादर करणाऱ्या रुचिता आणि सिद्धेश या जोडीने यावेळेच्या भागात लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकरांच्या आयुष्यावर सुंदर सादरीकरण करुन परिक्षकांची वाहवा मिळवली. सिद्धेश आणि रुचिताच्या या परफॉर्मन्सवर खूष होऊन सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका आणि कॅप्टन फुलवा खामकर यांनी त्यांच्या गुरुंनी दिलेले खास घुंगरु भेट म्हणून दिले. मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वनच्या मंचावरचा हा अतिशय भाऊक क्षण होता. गुरु-शिष्याचं नातं या प्रसंगाने आणखी द्विगुणीत झालं असं म्हणता येईल.
सिद्धेश आणि रुचिताने सादर केलेल्या या लावणीने उपस्थितांच्या डोळ्यांमध्ये पाणी आणलं. लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांनी आपल्या अदाकारीने रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. पोटापेक्षा कलेसाठी नाचणाऱ्या विठाबाई गरोदर असतानाही मंचावर नाचल्या, नाचता नाचता पोटात बाळंतपणाच्या कळा येवू लागल्या, स्टेजच्या मागे असणा-या तंबूत जाऊन विठाबाईंनी मुलीला जन्म दिला. बाळाची नाळ दगडाने ठेचून त्या पुन्हा स्टेजवर आल्या आणि पुन्हा नाचायला लागल्या. अशी ही लोककलावंत होणे नाही. विठाबाईंच्या जीवनचरित्राची एक छोटीशी झलक मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वनच्या मंचावर पाहायला मिळाली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.