Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धा*

*उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धा* छत्रपती शिवाजी मंदिर ट्रस्टच्या सहयोगाने.. मानाचि लेखक संघटना आयोजित करीत आहे, *उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धा २०२४* ' मानाचि लेखक संघटना ' अर्थात मालिका, नाटक, चित्रपट लेखकांनी, लेखकांची, लेखकांसाठी स्थापन केलेली संघटना, आपल्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त, छत्रपती शिवाजी मंदिर ट्रस्टच्या सहयोगाने, ' उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धा ' आयोजित करीत आहे. या स्पर्धेची मूळ संकल्पना मानाचिचे संस्थापक सदस्य, श्री. सुहास कामत यांची आहे . ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून, या स्पर्धेत सहभागी होणारी प्रत्येक टीम स्पर्धेच्या दिवशी एक चिठ्ठी उचलेल. त्यात खाली दिलेल्या विषयांपैकी एक विषय असेल. त्या विषयाच्या तयारीसाठी त्या टीमला एक तास दिला जाईल. एक तासानंतर त्या टीमला परीक्षकांसमोर, त्या विषयाचे दहा ते पंधरा मिनिटांचे इम्प्रोव्हायझेशन, तालीम स्वरूपात सादर करावे लागेल. त्या प्राथमिक फेरीतून, अंतिम फेरीसाठी निवडलेल्या टीम्सना त्यांच्याच विषयावरील एकांकिका योग्य संहिता, आवश्यक नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा प्रकाशयोजना व पार्श्वसंगीतासह सादर करावी लागेल.
सर्वश्री अभिजीत पानसे, केदार शिंदे, सतीश राजवाडे व अभिराम भडकमकर या ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शकांनी स्पर्धेसाठी दिलेले २० विषय खालील प्रमाणे ; ०१ - Miss call ०२ - राम नाम सत्य है | ०३ - आलिया भोगासी…. ०४ - देवाशपथ खरं सांगेन ०५ - तू तेंव्हा तशी ०६ - ही वाट दूर जाते... ०७- माझे मन तुझे झाले ०८ - सुख कळले ०९ - राजकारण? नको रे बाबा १० - माझा पक्ष.. पितृपक्ष ११ - A.I. (आर्टीफिशियल इंटेलिजन्स) आणि आम्ही १२ - ⁠सिच्युएशनशिप (एक जोडपं नसलेल्या दोघांची, फ्रेंडशिप पलीकडली रिलेशनशिप) १३ - श्रद्धा सबुरी १४ - संगीत मेरी आवाज सूनो (संगीत व्यंगनाट्य) १५ - ⁠बॉर्डर ( कोणत्याही बॉर्डवरचा दोन शत्रूंमधला मजेशीर संवाद) १६ - आधुनिकतेच्या परिघावर १७ - तुझे आहे तुजपाशी १८ - आम्हास आम्ही पुन्हा पहावे १९ - विरोध अंतर्विरोध २० - इन मिन तीन स्पर्धेत भाग घेण्यास इच्छुक असलेल्या संस्थांनी व्हाट्सअप वर खालील फॉरमॅटमध्ये अर्ज भरावा व तो अर्ज श्री. प्रमोद लिमये यांना +919869066171 नंबर वर पाठवावा. या स्पर्धेसाठी ₹१,०००/- एन्ट्री फी आहे. फी भरण्यासाठी श्री प्रमोद लिमये QR CODE देतील. स्पर्धेचा अर्ज व फी दोन्ही भरून पाठवल्यानंतरच ती एन्ट्री मान्य केली जाईल. *स्पर्धेसाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख दि.३० मार्च २०२४ आहे.* स्पर्धेची प्राथमिक फेरी ६ व ७ (शनिवार,रविवार) एप्रिल २०२४ रोजी मुंबईत होईल. त्यातून निवडलेल्या एकांकिकांची अंतिम फेरी, सोमवार दिनांक ६ मे २०२४ रोजी मुंबईत श्री शिवाजी मंदिर, दादर येथे घेतली जाईल. त्याच दिवशी अंतिम फेरीचा निकाल आणि रोख रक्कम व मानचिन्हे अशा घसघशीत पारितोषकांचे वितरणही केले जाईल. अधिकाधिक स्पर्धक संस्थांनी या स्पर्धेत सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करावी, असे आवाहन मानाचि लेखक संघटनेच्या संचालक व सल्लागार मंडळाच्या वतीने, अध्यक्ष श्री. विवेक आपटे यांनी केले आहे. *मानाचि उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धा २०२४चा अर्ज* संस्थेचे नाव: पत्ता : संस्थाप्रमुखाचे नाव: पत्ता: मोबाईल नंबर: संस्था प्रतिनिधी १ नाव: पत्ता: मोबाईल नंबर: संस्था प्रतिनिधी २ नाव: पत्ता: मोबाईल नंबर:

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.