श्रेया बुगडेची हवा 'जाऊ बाई गावात' मध्ये*
December 25, 2023
0
*श्रेया बुगडेची हवा 'जाऊ बाई गावात' मध्ये*
प्रेक्षकांची उत्कंठा वाढवायला  आणि मनोरंजनाची रंगतदार आतिषबाजी  करायला ह्या आठवड्याचा खास पाहुणा येत आहे  गावात. मराठमोळी  लाफ्टर क्वीन म्हणजेच श्रेया बुगडेचा धमाकेदार अंदाज 'जाऊ बाई गावातच्या' वीकएंड भागात बघायला  मिळणार. हा नवीन पाहुणा ही रिकाम्या हातानी नाही आलाय एक गमतीदार कार्य घेऊन आला आहे. श्रेया बुगडे आली आहे तर टास्क ही काही तरी  आगळा वेगळा असणार, हे तर खरं आहे.  स्पर्धकांना गावातल्या लाजाळू मुलां बरोबर डांस करायचा आहे. जितकं सोप्प ऐकायला वाटतंय तितकाच अवघड हे कार्य असणार. आता मज्जा येणार जेव्हा शहरातल्या मुली, गावातल्या  लाजाळू मुलांना आपल्या तालावर नाचवायचा प्रयत्न करणार. 
कोण होईल ह्या कार्यचा विजेता आणि श्रेया कशी करेल ह्या स्पर्धकांची मदत बघायला खूप  मज्जा येणार. तर पाहायला विसरू नका 'जाऊ बाई गावात'  रात्री ९:३० वाजता आपल्या लाडक्या झी मराठी वाहिनी वर

 
 
 
