गुड बाय २०२३ झी मराठी !
December 25, 2023
0
*गुड बाय २०२३ झी मराठी !*
२०२३ चा निरोप देण्याची वेळ आली आहे, परंतु २०२३ ने दिलेल्या आठवणींसाठी त्याचे आभार मानल्या शिवाय त्याला गुड बाय करणं शक्य नाही.
'तुला शिकवीन चांगलाच धडा' मधील अधिपती म्हणजेच ऋषिकेश शेलार ने २०२३ ला निरोप देताना सांगितले, २०२३ ने मला बेस्ट भेट दिली माझ्या मुलीच्या रूपात, १२ जानेवारी माझ्या घरी लक्ष्मीच्या आली. त्याच सोबत पहिल्यांदा मला नायकाची भूमिका साकारायची संधी मिळाली. २०२३ ने मला हे शिकवलं की जर आपली स्वप्न पूर्णकारण्यासाठी मेहनत घेतली आणि त्याच्यावर ठाम विश्वास ठेवला तर ते नक्कीच सत्यात उतरतं. २०२३ तुझे आभार मानतो आयुष्यभर लक्षात राहतील अश्या आठवणी दिल्यास. येणार वर्षसुद्धा असंच असुदे अशी आशा आहे
'तुला शिवकीनं चांगलाच धडा' मधली अक्षरा म्हणजेच शिवानी रांगोळे म्हणाली २०२३ची माझी आवडती आठवण तेव्हाची आहे जेव्हा माझी मालिका 'तुला शिकवीन चांगलाच धडा' सुरु झाली. अक्षराची भूमिका एका शिक्षिकेची आहे आणि योगायोग असा की माझी आई शिक्षिका होती म्हणून हे पात्र माझ्या खूप जवळच आहे. या मालिकेची टीम इतकी मजेशीर आहे की काम करता करता खूप नवीन नवीन गोष्टी शिकायला ही मिळतात.
२०२३ मला स्वतःची काळजी कशी घ्यायची हे शिवकून जात आहे. काम आणि कुटुंब संतुलन कसं ठेवायचं हे ही त्यांनी मला शिकवले. २०२३ माझ्यासाठी खूप अविस्मरणीय वर्ष आहे मनासारखा प्रोजेक्ट, आवडणारी माणसं आयुष्यात आली. २०२३ला निरोप देताना येणारं नवीन वर्ष सुद्धा सुखाचं असुदे.
दक्षता जोईल म्हणजेच 'सारं काही तिच्यासाठीची' निशी, २०२३ला निरोप देताना हेच सांगेन की खूप छान छान आठवणी तू मला दिल्या. २०२३ मध्ये मी आई बाबांच्या आणि प्रेक्षकांच्या आशिर्वादाने अनपेक्षित गोष्टी घडल्या. माझ्या कडून ज्या चुका झाल्याआहेत, ज्यागोष्टी करायच्या राहून गेल्या आहेत त्या करायला २०२३ नी एक ऊर्जा दिली. २०२३ मध्ये खूप चांगली माणसं माझ्या आयुष्यात आली, मला एक भव्य संधी मिळाली. मला झी मराठी अवॉर्ड्स सोहळ्यात अवॉर्ड मिळाला. २०२३ कडून मी हे शिकले की प्रत्येक दिवस सारखा नसतो पण जर तुम्ही प्रामाणिक असाल तर तुम्ही तुमचा दिवस घडवू शकता.
सातव्या मुलीची सातवी मुलगी मधली रुपाली म्हणजेच ऐश्वर्या नारकर, २०२३ मधली माझी आवडती आठवण म्हणजे एका बोक्याला पुष्कळ दुखापत झाली होती आणि मी त्याला दवाखान्यात नेऊन त्याचा जीव वाचवला. त्याला झालेली इजा इतकी गंभीर होती की त्याच वाचणं मुश्किल होतं. पण वेळेत उपचार मिळाला म्हणून तो ठणठणीत झाला. मग मी त्याला त्याच्या घराच्या इथे पोहचवून आली. मला असा वाटतं मुक्या जनावरांना आपल्या साथीची गरज आहे आणि त्यांची मदत करून माझं मन प्रसन्न होतं. २०२३ मला हे शिकवून जात आहे की आपण एक मेकांचा विचार केला पाहिजे. ह्या वर्षी मी नवीन कार्यांशी जोडली गेली जे प्राण्यांची खळजी घेतात . २०२३ ला निरोप देताना हेच सांगेन खूप समाधान दिलेस तू म्हणून तुझे मना पासून आभार.
तितिक्षा तावडे म्हणजेच सातव्या मुलीची सातवी मुलगी मधली नेत्रा, म्हणाली २०२३ मधली बेस्ट आठवण म्हणजे माझा वाढदिवस खूप छान साजरा झाला. आई, बाबा, माझी बहीण, भाऊजी, भाचा आणि माझ्या काही महत्वाच्या माणसांनी माझा दिवस संस्मरणीय बनवला . २०२३ ने मला संयम ठेवायला शिकवले. २०२२ मध्ये ज्या गोष्टी माझ्याकडे नव्हत्या त्या मला २०२३ नी दिल्या आणि तीच खूप मोठी शिकवण होती. २०२३ ने मला शिकवले की थोडा संयम ठेवलास तर जे हवं ते तुझ्या पर्यंत येणार. २०२३ चे फक्त आभार मानीन त्यांनी मला खूप काही दिले ज्यासाठी मी प्रार्थना करायचे त्यागोष्टी आता माझ्या आहेत. २०२३ नी मला भरपूर प्रसिद्धी, सातव्या मुलीची सातवी मुलगी सारखा शो आणि प्रेक्षकांचे अपार प्रेम दिले
तर बघायला विसरू नका 'सारं काही तिच्यासाठी' संध्या ७:३० वाजता, 'तुला शिकवीन चांगलाच धडा' रात्री ८:०० वाजता आणि 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' रात्री १०:३० वाजता फक्त झी मराठीवर.