ये रिश्ता क्या कहलाता है’मध्ये ६ नोव्हेंबरपासून सुरू होणार नवे पर्व; समृद्धी शुक्ला आणि शहजादा धामी दिसणार मुख्य भूमिकेत*
November 05, 2023
0
*‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मध्ये ६ नोव्हेंबरपासून सुरू होणार नवे पर्व; समृद्धी शुक्ला आणि शहजादा धामी दिसणार मुख्य भूमिकेत*
‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या लोकप्रिय मालिकेच्या नव्या पर्वाला ६ नोव्हेंबरपासून रात्रौ ९.३० वाजता सुरूवात होणार आहे. या मालिकेच्या नव्या पर्वात उलगडत जाणाऱ्या नाट्याचे साक्षीदार होण्याची संधी या निमित्ताने प्रेक्षकांना चालून आली आहे.
‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेचा संपन्न वारसा पुढे नेण्याकरता समृद्धी शुक्ला आणि शहजादा धामी सज्ज झाले असून ही मालिका आता पुढच्या पिढीत झेप घेणार आहे. स्टार प्लसने या मालिकेचा नवा प्रोमो नुकताच प्रसारित केला असून नव्या रंजक प्रोमोसह निर्मात्यांनी, मालिकेच्या नव्या पर्वात भूमिका करणाऱ्या समृद्धी शुक्ला, शहजादा धामी, शिवम खजुरिया आणि प्रतीक्षा होनमुखे या कलावंतांची, ते निभावत असलेल्या अनुक्रमे अभिरा, अरमान, रोहित आणि रुही या पात्रांद्वारे ओळख करून दिली आहे.
या नव्या ‘प्रोमो’मध्ये अभिराच्या आयुष्यात येणारे एक अनपेक्षित वळण दाखवण्यात आले आहे, जे कथानकाची नवी दिशा निश्चित करते. अभिराचा अरमानशी विवाह झाला असला, तरी त्यांच्या कुटुंबियांनी या दोघांचे लग्न स्वीकारलेले नाही, या वळणावर ही मालिका पुढे जाणार आहे. आता, अभिरा आणि अरमान यांच्या आयुष्यातील घडणाऱ्या नाट्याचे साक्षीदार होणे चाहत्यांसाठी नक्कीच रंजक ठरणार आहे. अभिरा, अरमान, रुही आणि रोहित यांच्या नशिबात नक्की काय वाढून ठेवले आहे, आणि हे सारे घडताना त्यांचे नाते परस्परांशी कसे गुंफले जात आहे, हे पाहणे रसिकांसाठी निश्चितच एक वेगळा अनुभव असेल. याशिवाय, या मालिकेतून नव्या पिढीद्वारे रसिकांच्या भेटीला येणाऱ्या समृद्धी शुक्ला आणि शहजादा धामी या कलावंतांच्या आगमनाने मालिकेतील नाट्यमय घटनांतून भावना आणि नातेसंबंधांचे केले गेलेले चित्रण प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारे असेल.
*‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या ‘स्टार प्लस’च्या मालिकेत अभिराची भूमिका साकारणारी समृद्धी शुक्ला म्हणते,* "अभिरा आणि अरमान यांचे व्यक्तिमत्व परस्परांपासून पूर्णपणे वेगळे आहे. अभिरा ही एक स्वतंत्र मुलगी आहे; अरमानकडे त्याचे करिअर सुरू करण्याच्या वेगवेगळ्या योजना आहेत, परंतु अभिरा आणि अरमान या दोघांकरता नियती काही वेगळेच योजत आहे, ज्याचे ‘प्रोमो’द्वारे साक्षीदार होण्याची संधी प्रेक्षकांना चालून आली आहे. अभिरा आणि अरमानच्या आयुष्यात होणारे अनपेक्षित बदल आणि त्यांच्या आयुष्यात येणारे वेगवेगळी वळणे पाहणे प्रेक्षकांकरता रंजक असेल. मी मालिकेचा वारसा पुढे नेण्यास उत्सुक आहे आणि आशा आहे की, प्रेक्षक आमच्यावरही तितकेच प्रेम करतील आणि प्रेक्षकांचे कौतुक आमच्या वाट्याला येईल."
सध्या हर्षद चोप्रा आणि प्रणाली राठोड ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत प्रमुख पात्रे साकारत आहेत. या दोन्ही कलाकारांनी अभिमन्यू आणि अक्षरा यांच्या भूमिका निभावल्या आहेत आणि त्यांचे उत्कट चाहते या युगुलाला ‘अभिरा’ नावे संबोधतात. प्रणाली राठोड आणि हर्षद चोप्रा यांनी मालिकेचा निरोप घेतल्याने समृद्धी शुक्ला आणि शहजादा धामी यांना मालिकेतील भूमिका साकारण्याचा मार्ग खुला झाला आहे.
रसिकांना ६ नोव्हेंबरपासून रात्रौ ९.३० वाजता स्टार प्लस दूरचित्रवाणी वाहिनीवर सुरू होत असलेल्या ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेच्या नव्या प्रवासाचे साक्षीदार होता येईल. या मालिकेची निर्मिती राजन शाही यांनी केली आहे.
