Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

निकलोडियनने केली भारतात जागतिक स्‍तरावरील सुपरहिट 'द ट्विस्‍टेड टाइमलाइन ऑफ सॅमी अॅण्‍ड राज' लाँच

 निकलोडियन हे भारतातील लहान मुलांच्‍या मनोरंजनासाठी पहिल्‍या क्रमांकाचा गंतव्‍य आपले अनोखेपण दाखवण्‍यास सज्‍ज आहे आणि सर्वोत्तम व संबंधित कथानकाच्‍या माध्‍यमातून डायनॅमिक किड्स श्रेणीमध्‍ये नवीन बेंचमार्क्‍स स्‍थापित करत आहे. सर्वोत्तम मनोरंजनाला ओळखत त्‍याची पूर्तता करण्‍याप्रती कटिबद्ध असलेल्‍या नेटवर्कशी बांधील राहत निकलोडियनने पुन्‍हा एकदा किड्स श्रेणीमध्‍ये नवीन मनोरंजनपूर्ण शो आणला आहे. मोटू पतलूशिवारूद्रापिनाकी अॅण्‍ड हॅप्‍पी - द भूत बंधूसचिकू और बंटीअभिमन्‍यू की एलियन फॅमिली अशा विनोदीशैलीला नव्‍या उंचीवर घेऊन जाणाऱ्या मनोरंजनपूर्ण शोजनंतर निकलोडियन भारतात निकलोडियन इं‍टरनॅशनलसोबत पहिल्‍यांदाच सह-निर्मिती केलेला शो '‍द ट्विस्‍टेड टाइमलाइन ऑफ सॅमी अॅण्‍ड राजसादर करण्‍यास सज्‍ज आहे. १५ ऑक्‍टोबरपासून नवीन कॉमेडी शो दर शनिवार व रविवार दुपारी १ वाजता प्रसारित होईल. 

अनोखी अॅनिमेटेड सिरीज '‍द ट्विस्‍टेड टाइमलाइन ऑफ सॅमी अॅण्‍ड राजदोन चुलत भावंडे सॅमी व राज यांच्‍या कृत्‍यांच्‍या अवतीभोवती फिरतेज्‍यांच्‍याकडे अद्वितीय व रहस्‍यमय वेळ बदलणारे अॅप आहे. वेळेला थांबवण्‍याचीभूतकाळात व भविष्‍यात घेऊन जाण्‍याची असाधारण क्षमता असलेले सॅमी व राज अद्भुत साहसी प्रवासावर जातातजेथे ते विविध समस्‍यांचा सामना करत त्‍यांचे निराकरण करण्‍याचा प्रयत्‍न करतात. पण चांगले हेतू असलेल्‍या त्‍यांच्‍या प्रयत्‍नांनंतर देखील ते गोंधळयुक्‍त व विनोदी स्थितींमध्‍ये अडकून जातात. प्रत्‍येक एपिसोडमध्‍ये सॅमी व राज नवीन व मनोरंजनपूर्ण आव्‍हानांचा सामना करतीलतसेच त्‍यांच्‍या मार्गात येणाऱ्या अडथळयांना दूर करण्‍यासाठी त्‍यांच्‍या वेळ बदलणाऱ्या अॅपचा उत्तमरित्‍या वापर करतील. 



निकलोडियन इंटरनॅशनलसोबतच्‍या सहयोगाबाबत आपले मत व्‍यक्‍त करत व्‍हायकॉम१८ मधील किड्स टीव्‍ही नेटवर्कच्‍या क्रिएटिव्‍हकन्‍टेन्‍ट व रिसर्चच्‍या प्रमुख अनू सिक्‍का म्‍हणाल्‍या, '''द ट्विस्‍टेड टाइमलाइन ऑफ सॅमी अॅण्‍ड राजही सिरीज आमच्‍या लहान प्रेक्षकांना वैविध्‍यपूर्णसर्वसमावेशकउच्‍च दर्जाच्‍या कन्‍टेन्‍टचा आनंद देण्‍यासाठी निकलोडियन इंटरनॅशनल व आमच्‍यामधील सहयोगाचा पुरावा आहे. विनोदाने भरलेली ही टाइम ट्रॅव्‍हल कथा आमच्‍या श्रेणीमधील नवीन व अद्वितीय भर आहे. आम्‍हाला विश्‍वास आहे की हा शो त्‍वरित लोकप्रिय ठरेलज्‍यामधून किड्स व श्रेणीप्रती आमची कटिबद्धता अधिक दृढ होईल.''

पॅरामाऊण्टच्‍या ग्‍लोबल किड्स अॅण्‍ड फॅमिली ग्रुपसाठी इंटरनॅशनल प्रॉडक्शन व डेव्‍हलपमेंटचे उपाध्‍यक्ष ख्रिस रोज म्‍हणाले, '''‍द ट्विस्‍टेड टाइमलाइन ऑफ सॅमी अॅण्‍ड राजसिरीज व्‍हायकॉम१८ सोबतच्‍या आमच्‍या यशस्‍वी सहयोगामधून सादर करण्‍यात आली आहे. व्‍यापक सहयोग व प्रबळ टीमवर्कमुळे आम्‍ही प्रबळ कथानक निर्माण करण्‍यामध्‍ये यशस्‍वी ठरलोजी पूर्व व पश्चिमेकडील संवदेनांमधील फरकाचा शोध घेते. हे कथानक तयार करण्‍यासाठी आणि किड्स शोकरिता पात्र ठरवण्‍यासाठी भारतातील टीमने महत्त्‍वाची भूमिका बजावलीज्‍यामुळे प्रेक्षकांना भारतीय संस्‍कृतीचा आनंद देण्‍यासोबत वैश्विक कथानक कॅप्‍चर करता आले आहेजे निश्चितच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेईल.''

'द ट्विस्‍टेड टाइमलाइन ऑफ सॅमी अॅण्‍ड राज'च्‍या लाँचला निकलोडियन फ्रँचायझीच्‍या प्रबळ मल्‍टी-स्क्रिन मार्केटिंग प्‍लानचा पाठिंबा आहेतसेच सोशल मीडिया व विविध इतर डिजिटल व्‍यासपीठगेम्‍सकनेक्‍टेड टीव्‍ही यांवर आणि सहयोग करण्‍यात आलेल्‍या प्रभावकांसोबत या शोचा प्रचार करण्‍यात येणार आहे. या प्‍लानमध्‍ये अधिक उत्‍साहाची भर म्‍हणजे नाविन्‍यपूर्ण एआर फिल्‍टरजे लहान मुलांना त्‍यांचे लुक बदलत विविध काळांमध्‍ये घेऊन जाईल आणि लहान मुलांचे व ब्रॅण्‍ड्सचे लक्ष वेधून घेईल.  

सॅमी व राजसह साहसी प्रवासावर जाण्‍यास सज्‍ज राहा आणि पहा निकलोडियनचा शो 'द ट्विस्‍टेड टाइमलाइन ऑफ सॅमी अॅण्‍ड राज१५ ऑक्‍टोबरपासून दर शनिवार व रविवार दुपारी १ वाजता

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.