Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

स्टार प्लस घेऊन येत आहे " डान्स प्लस " चा नवा सिझन

 *स्टार प्लस घेऊन येत आहे  डान्स प्लसचा नवा कोरा धम्माल डान्स मस्तीचा सातवा सीजन*


डान्स प्लस हा एक डान्स रिएलिटी शो आहे जो अगदी त्याच्या पहिल्या सीजनपासूनच प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. आता चाहत्यांच्या या सर्वात आवडत्या रिएलिटी शोचा नवा सीझन परत येत आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकले आहे, स्टार प्लस डान्स प्लसचा सातवा सीझन घेऊन परत येत आहे. या शोच्या शेवटच्या म्हणजे सहाव्या सीझनने प्रेक्षकांना त्यांच्या टिव्ही स्क्रीनवर खिळवून ठेवले होते. तेव्हा पासून सर्वच जण या शोची पुन्हा एकदा आतुरतेने वाट पाहत होते, आणि त्यांची ही प्रतिक्षा आता लवकरच संपणार आहे.



स्टार प्लसने आपला मॅग्नम ओपस डान्स रिएलिटी शो डान्स प्लसचा सातवा सीजन घेऊन येत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे प्रेक्षकांची आणि चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. डान्स प्लसच्या नवीन सीझनमध्ये, दर्शकांना आता आणखी विविध आणि एकाहून एक सरस प्रतिभेची चुणूक पाहायला मिळणार आहे त्यामुळे प्रेक्षक डान्स प्लसच्या नव्या कोऱ्या सातव्या सीजनकडून आणखी एका खुमसदार मनोरंजनाची अपेक्षा नक्की करू शकतात.


डान्स प्लसच्या संकल्पनेनुसार स्पर्धकांना कोरिओग्राफर प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण दिले जाते. या शोमध्ये स्पर्धक ग्रुपमध्ये किंवा सोलोमध्ये स्वत:ला सादर करतात. तेव्हा तयार व्हा या नव्या कोऱ्या धम्माल डान्स मस्तीसाठी केवळ स्टार प्लसवर. 


डान्स प्लस सीझन 7 स्टार प्लसवर आणि डिस्ने+ हॉटस्टारवर लवकरच प्रसारित होणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.