समीक्षकांनी नावाजलेला ‘गोदावरी’ चित्रपट ३ जूनपासून जिओसिनेमावर मोफत स्ट्रीम होणार
अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये गौरवण्यात आलेला, निखिल महाजन यांचा ‘गोदावरी’ हा चित्रपट जिओ सिनेमावरील डिजिटल प्रीमियरद्वारे आणखी अनेक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यास सज्ज आहे. ३ जूनपासून हा चित्रपट जिओसिनेमावर विनाशुल्क स्ट्रीम करता येणार आहे. जीतेंद्र जोशी, नीना कुलकर्णी, विक्रम गोखले, गौरी नलावडे, प्रियदर्शन जाधव आणि संजय मोने यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची कथा नाशिकमधील गोदावरी नदीच्या काठी राहणाऱ्या एका कुटुंबाभोवती फिरते.
भावना, आव्हाने आणि मानवी नातेसंबंधांच्या नाजूक पदरांचा वेध हा चित्रपट सुंदररित्या घेतो. नदीच्या रम्य पार्श्वभूमीवर घडणाऱ्या या चित्रपटाची कथा निखिल महाजन व प्राजक्ता देशमुख यांची आहे. २०२१ मध्ये व्हँकुव्हर चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचे प्रदर्शन झाले. खिळवून ठेवणारी कथा आणि अप्रतिम अभिनयासाठी या चित्रपटाचे तेथे खूप कौतुक झाले.
‘गोदावरी’चा डिजिटल प्रीमियर चुकवू नका, ३ जूनपासून मोफत स्ट्रीम करा केवळ जिओसिनेमावर!