Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

यामीच्या पुरणपोळीच्या गप्पा अन् माधुरीचा तिखट पदार्थांचा किस्सा;

 *यामीच्या पुरणपोळीच्या गप्पा अन् माधुरीचा तिखट पदार्थांचा किस्सा; ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर रंगल्या दिलखुलास गप्पा!*


https://www.instagram.com/reel/DehLVixDTH2/?cplk=Zm1lM2Z1MHc1a2I4


सोनी मराठीवरील ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनातून अभिनेत्री माधुरी दीक्षित आपल्या सहजसुंदर शैलीनं, विनोदबुद्धीनं आणि दिलखुलास गप्पांनी प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. या कार्यक्रमात स्पर्धक आणि पाहुण्यांशी संवाद साधताना माधुरीच्या आयुष्यातील अनेक रंजक गोष्टीही समोर येत आहेत. आगामी भागात माधुरीनं तिच्या गर्भावस्थेतील अनुभव शेअर केले. विशेष म्हणजे, धाकट्या मुलाच्या वेळी तिला चमचमीत आणि चटपटीत पदार्थ खायचे डोहाळे लागले होते आणि आता घरात सर्वाधिक तिखट पदार्थ तिचा हा धाकटा मुलगाच खातो, अशी आठवण माधुरीने या गप्पांमध्ये सांगितली. 



आगामी भागात अभिनेत्री यामी गौतम आणि अभिनेता आदिनाथ कोठारे त्यांच्या ‘नयी नवेली’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी माधुरीसोबत संवाद साधताना दिसणार आहेत. यावेळी यामीच्या गर्भावस्थेतील आठवणी आणि महाराष्ट्रीयन गोड पदार्थांबद्दलच्या तिच्या आवडीचा विषय निघताच माधुरीनेही तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही खास आठवणींना उजाळा दिला.


आपल्या पहिल्या गर्भधारणेची बातमी सर्वांना सांगितल्यानंतरचा अनुभव सांगताना यामी म्हणाली, “मला आठवतंय, ‘आर्टिकल ३७०’च्या ट्रेलर लॉन्चवेळी आम्ही माध्यमांसमोर पहिल्या बाळाच्या आगमनाची बातमी सांगितली होती. पत्रकार परिषद संपताच मी घरी फोन करून आमच्या स्वयंपाकीण काकूंना फोन केला आणि त्यांना सांगितलं, ‘लवकर पुरणपोळी बनवून ठेवा. मला पुरणपोळी खायची इच्छा आहे! हा दिवस मला पुरणपोळी आणि उकडीच्या मोदकांसोबत साजरा करायचा आहे.”


यामीच्या तोंडून उकडीच्या मोदकांचा उल्लेख ऐकताच माधुरीनंही उत्साहानं आपल्या आवडीची कबुली दिली. आणि, स्वतःच्या गर्भावस्थेतील आठवण सांगितली. माधुरी म्हणाली, “मला उकडीचे मोदक खूप आवडतात! पण माझ्या दोन्ही गर्भावस्थांमध्ये मला कोणतेही खास डोहाळे लागले नव्हते. मात्र, धाकटा मुलगा पोटात असताना मला चमचमीत आणि चटपटीत पदार्थ खावेसे वाटायचे. आणि आता तर आमच्या घरात सगळ्यात जास्त तिखट खाणारा तोच आहे!”


माधुरीचा हा किस्सा ऐकल्यानंतर गप्पांमध्ये आणखी रंगत आली. यामीच्या गोड पदार्थांच्या आवडीचा संदर्भ घेत माधुरीने तिलाही एक मजेशीर प्रश्न विचारला. ती म्हणाली, “मग आता तुझ्या मुलाला गोड पदार्थ खायला आवडतात का?”


माधुरीने सांगितलेला हा गमतीशीर अनुभव आणि यामीसोबत झालेल्या दिलखुलास गप्पांमुळे ‘कोण होणार करोडपती’च्या आगामी भागात प्रेक्षकांना मनोरंजनासोबतच या कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याची एक खास झलक पाहायला मिळाली.


पहात रहा, ‘कोण होणार करोडपती’, सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता फक्त सोनी मराठी आणि सोनी लिववर!

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.