Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जयंती २' चा जबरदस्त टीझर प्रदर्शित; चित्रपट येतोय ११ सप्टेंबरला

जयंती २' चा जबरदस्त टीझर प्रदर्शित; चित्रपट येतोय ११ सप्टेंबरला


*सशक्त महिला पात्र असलेला 'जयंती २' येतोय ११ सप्टेंबरला*

"जयंती २" मधून उलगडणार एका विद्यार्थिनीच्या वाट्याला येणारा भेदभाव




  काही वर्षांपूर्वी आलेल्या 'जयंती' या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटानं सामाजिक क्षेत्रात मोठी चर्चा घडवली होती. 'जयंती २'  येत्या ११ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. उत्कृष्ट स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. चित्रपटाचा नायक संत्या म्हणजेच अभिनेता ऋतुराज वानखेडे याची चित्रपाटात मध्यवर्ती भूमिका असून टीझरमध्ये दिसत असलेल्या अभिनेत्रींच्या भूमिकाही चित्रपटात आपली महत्वपूर्ण कामगिरी बजावताना दिसत आहेत. "जयंती २' हा चित्रपट सध्याच्या शिक्षण व्यवस्थेशी संबंधित असेलल्या विषयावर भाष्य करणारा आहे. एका ग्रामीण भागातील विद्यार्थिनीच्या वाट्याला येणारा भेदभाव हा चित्रपटाचा विषय असल्याचं टीजवरून जाणवतं. 


'जयंती २' या चित्रपटाची निर्मिती मेलिओरिस्ट फिल्म स्टुडिओने केली असून चित्रपटाची कथा, संवाद आणि दिग्दर्शन शैलेश बळीराम नरवाडे यांचे आहे. 'जयंती' चित्रपटाचा प्रमुख चेहरा असलेला अभिनेता ऋतुराज वानखेडे या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारत असून पायल जाधव, अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर, रोहिणी हट्टंगडी, देविका दफ्तरदार, विजय निकम, राजकुमार जरांगे, मानसी सुभाष अशी दमदार कलाकारांची फौज आपल्याला या चित्रपटातून भेटीस येणार आहे. संजीवकुमार हिल्ली यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले असून संकलन फैसल महाडिक यांचे आहे. डॉ. सुहास अंबादे , सुहास मुंडे आणि सौरभ गुरू यांनी लिहिलेल्या गीतांना ओंकारस्वररूप यांचे संगीत लाभले असून पार्श्वसंगीत मंगेश धाकडे यांचे आहे.



'जयंती' हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीचा तरुणांवर पडणारा प्रभाव आणि होणारा सकारात्मक बदल याची गोष्ट  चित्रपटात मांडण्यात आली होती.अत्यंत वेगळा विषय आणि नव्या पद्धतीच्या मांडणीमुळे या चित्रपटाची मोठी चर्चा झाली, बॉक्स ऑफिसवरही चित्रपटानं यश पाहिलं होतं. आता त्या पुढे जाऊन सध्या शिक्षण क्षेत्रात अनेक घडामोडी घडत असताना 'जयंती २' हा चित्रपट निश्चितच महत्त्वाचा ठरणार आहे. उत्तम कलाकार असलेल्या या चित्रपटाचा टीजर अत्यंत प्रभावी आणि मनाला भिडणारा असा आहे. त्यामुळेच चित्रपटाविषयीची उत्सुकता आता नक्कीच वाढली आहे.


*Teaser Link*

https://youtu.be/eLw9eOM9FDU?si=E1fq0K6NQR2p4PfJ


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.