Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ऐल्फा' मधील आलिया भट्ट आणि शर्वरी यांच्यावर चित्रित 'मॅसॅकर' हे प्रमोशनल म्युझिक व्हिडीओ वायआरएफ कडून प्रदर्शित!

 'ऐल्फा' मधील आलिया भट्ट आणि शर्वरी यांच्यावर चित्रित 'मॅसॅकर' हे प्रमोशनल म्युझिक व्हिडीओ वायआरएफ कडून प्रदर्शित!


यश राज फिल्म्सने 'ऐल्फा' चित्रपटातील आलिया भट्ट आणि शर्वरी यांच्यावर चित्रित करण्यात आलेला 'मॅसॅकर' हा खास प्रमोशनल म्युझिक व्हिडीओ प्रदर्शित केला आहे. चित्रपटाचे एंड क्रेडिट्स संपल्यानंतर दाखवण्यात येणाऱ्या या गाण्यात आलिया आणि शर्वरी 'ऐल्फा' मुलींचा आत्मविश्वास, त्यांची दमदार उपस्थिती आणि 'मॅसॅकर' घडवून आणण्याची त्यांची ताकद अत्यंत स्टायलिश आणि मनोरंजक अंदाजात सादर करताना दिसत आहेत.


हे गाणे येथे पाहा: https://youtu.be/q5HK8lXE_aE


या दमदार गाण्याला रोहांश आणि अबीर यांनी संगीत दिले असून शिल्पा राव आणि जोनिता गांधी यांनी ते गायले आहे. गाण्याचे बोल कौसर मुनीर यांनी लिहिले आहेत. आलिया आणि शर्वरी यांनी इन्स्टाग्राम लाईव्हदरम्यान या गाण्याची झलक दाखवल्यानंतर चाहत्यांमध्ये या गाण्याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती आणि त्याच्या प्रदर्शनाची जोरदार मागणी होत होती.



आधुनिक धाटणीचे संगीत आणि आकर्षक दृश्यांनी सजलेले 'मॅसॅकर' हे गाणे ऐल्फा च्या स्टायलिश अॅक्शन विश्वाला अधिक प्रभावी बनवते. तसेच आलिया भट्ट आणि शर्वरी यांच्या जबरदस्त स्क्रीन प्रेझेन्सलाही हे गाणे अधिक उठावदारपणे सादर करते.


आदित्य चोप्रा निर्मित आणि शिव रवैल दिग्दर्शित ऐल्फा मध्ये बॉबी देओल आणि अनिल कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ३ जुलै रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट सध्या जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित असून प्रेक्षकांना दमदार अॅक्शन, थरार आणि भरभरून मनोरंजनाचा अनुभव देत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.