Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज!* *प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’*

 *‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज!* 

*प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’*


झी स्टुडिओज प्रस्तुत आणि कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित ‘भूतम भयम्’ हा बहुचर्चित मराठी हॉरर-कॉमेडी चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हॉरर, कॉमेडी आणि रहस्याचा भन्नाट संगम असलेल्या या चित्रपटाचं सर्व स्तरांतून कौतुक होत असतानाच आता प्रेक्षकांसाठी आणखी एक खास सरप्राईज समोर आलं आहे.



चित्रपटात आधीच दमदार कलाकारांची फौज असताना आता आणखी एका महत्त्वाच्या व्यक्तिरेखेचा खुलासा करण्यात आला आहे. अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव या चित्रपटात ‘मया’ ही अतिशय वेगळी आणि रहस्यमय भूमिका साकारत आहे.


चित्रपटातील ‘मया’ हा विचित्र स्वभावाचा, अनाकलनीय आणि प्रेक्षकांना सतत संभ्रमात ठेवणारा आहे. त्याच्या प्रत्येक हालचालीमागे एक गूढ दडलं असून तो कथेला अनपेक्षित वळण देतो. हा मया नेमका कोण आहे? त्याचा या सगळ्याशी काय संबंध आहे? आणि तो नेमकं काय करतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मात्र चित्रपट पाहिल्यानंतरच मिळणार आहेत.


याविषयी प्रियांदर्शन जाधव म्हणाला, ‘’ ‘भूतम भयम्’चा भाग होणं हा माझ्यासाठी खूप वेगळा आणि आनंददायी अनुभव होता. ‘मया’ ही व्यक्तिरेखा पहिल्यांदा ऐकली तेव्हाच तिचं वेगळेपण मला खूप भावलं. वरकरणी साधा वाटणारा हा माणूस प्रत्यक्षात अनेक रहस्यांनी भरलेला आहे. या भूमिकेचा स्वभाव, त्याची देहबोली, संवादफेक आणि त्यामागचं गूढ जपणं हे माझ्यासाठी कलाकार म्हणून मोठं आव्हान होतं. अशा प्रकारची व्यक्तिरेखा साकारताना प्रत्येक प्रसंगात काहीतरी नवीन करण्याची संधी मिळाली. प्रेक्षकांना ‘मया’ नक्कीच आश्चर्याचा धक्का देईल आणि चित्रपट संपल्यानंतरही ही व्यक्तिरेखा त्यांच्या लक्षात राहील, असा मला विश्वास आहे.’’


रामचंद्र अरुण गांवकर लिखित आणि दिग्दर्शित ‘भूतम भयम्’ या चित्रपटाचे निर्माते नरेन कुमार आणि महेश ज्ञानदेव कोरडे असून, बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ता आहेत. चित्रपटात करण सोनावणे, नील साळेकर, सौरभ घाडगे, शुभम जाधव, सिद्धांत सरफरे, मनमीत पेम, पुष्कराज चिरपुटकर, छाया कदम, प्रियदर्शन जाधव यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.