*स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका लग्नानंतर होईलच प्रेम आता नव्या वेळेत*
*काव्या-पार्थ आणि जिवा-नंदिनीची गोष्ट २९ जूनपासून पाहायला मिळणार दुपारी १ वाजता*
स्टार प्रवाहवरील प्रेक्षकांची लाडकी मालिका ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ आता नव्या वेळेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काव्या-पार्थ आणि जिवा-नंदिनीच्या जोडीवर प्रेक्षक मनापासून प्रेम करतात. प्रत्येक वळणावर नव्या आव्हानांना सामोरं जात असतानाही या पात्रांनी नात्यांवरचा विश्वास आणि प्रेमाची ताकद कायम ठेवली आहे. त्यामुळेच महाराष्ट्राने या मालिकेला उचलून धरलं. मालिकेचा यापुढील प्रवास अधिक उत्कंठावर्धक आणि रंजक होणार आहे.
नव्या वेळेत ही मालिका तितक्याच उत्साहाने प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे काव्या-पार्थ आणि जिवा-नंदिनीच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि नात्यांचा प्रवास अनुभवण्यासाठी लग्नानंतर होईलच प्रेम नक्की पाहा.
.
