Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत समर्थ पॅनेलचा दणदणीत विजय*

 *अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत समर्थ पॅनेलचा दणदणीत विजय*




अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनेलने एकहाती विजय मिळवत वर्चस्व कायम राखले आहे. थेट निवडणुकीसाठी झालेल्या १४ जागांपैकी सर्व १४ जागांवर समर्थ पॅनेलचे उमेदवार विजयी झाले, तर विरोधी चित्रकर्मी पॅनेलला एकही जागा मिळवता आली नाही.


महामंडळाच्या एकूण १७ जागांपैकी तीन जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. उर्वरित १४ जागांसाठी झालेल्या मतदानात सभासदांनी समर्थ पॅनेलच्या बाजूने स्पष्ट कौल दिला.


*समर्थ पॅनेलचे विजयी उमेदवार*

निर्माता विभागातून मेघराज राजेभोसले (९५१ मते) आणि सुनील महाजन (७८६ मते) विजयी झाले. दिग्दर्शक विभागातून दीपक कदम (८४६ मते) आणि अजित शिरोळे (७५६ मते) यांनी विजय मिळवला. लेखक विभागातून राज काजी (८५० मते), अभिनेता विभागातून सुशांत शेलार (८९१ मते), छायाचित्रण विभागातून धनाजी यमकर (९५२ मते) , नृत्य दिग्दर्शन विभागातून सुभाष नकाशे (८९२ मते), ध्वनिमुद्रण विभागातून शरद चव्हाण (९७५ मते), कला दिग्दर्शन विभागातून प्रवीण पाटील (८८५ मते), रंगभूषा विभागातून चैत्राली डोंगरे (९९८मते), निर्मिती व्यवस्थापन विभागातून रवींद्र गावडे (९१० मते), वितरण व प्रसिद्धी विभागातून गणेश गारगोटे (९०७ मते) आणि कामगार विभागातून विकास तोरणे (८८६ मते) विजयी झाले.



दरम्यान, अभिनेत्री  विभागातून ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची बिनविरोध निवड झाली. तसेच संकलक विभागातून विजय खोचीकर आणि संगीत विभागातून गायक आनंद शिंदे हे बिनविरोध निवडून आले.


या निकालामुळे मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वावरील सभासदांचा विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला असून पुढील पाच वर्षांसाठी महामंडळाची धुरा समर्थ पॅनेलकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.