Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*भूषण प्रधानची 'स्वप्नसुंदरी' आता लवकरच झळकणार पडद्यावर !*

 *भूषण प्रधानची '


स्वप्नसुंदरी' आता लवकरच झळकणार पडद्यावर !*

*२४ जुलैला येणार प्रेक्षकांच्या भेटीला*


तरुणाईचा लाडका अभिनेता भूषण प्रधान याने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर 'सेव्ह द डेट' अशी  एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती. पोस्टमधील रोमँटिक फोटो आणि एंगेजमेंट रिंगमुळे अनेकांनी तो लग्नबंधनात अडकणार का? लग्नाची तारीख जाहीर केली का? असे प्रश्न उपस्थित केले होते. त्याच्या या पोस्टची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. अखेर या चर्चेचा उलगडा झाला असून त्याचा नवीन चित्रपट 'स्वप्नसुंदरी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.


नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर समोर आले असून त्यामध्ये भूषण प्रधान आणि सायली पाटील यांची सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळते. निसर्गाच्या सान्निध्यात एका निवांत ठिकाणी बसलेली ही जोडी, एकमेकांच्या सहवासात हरवलेली दिसते. सायली पाटील पारंपरिक वेशात अत्यंत मोहक दिसत असून, भूषण प्रधान तिच्याकडे प्रेमाने पाहाताना दिसतो. पोस्टरमधील संपूर्ण मांडणी एक स्वप्नवत आणि भावनांनी भरलेला अनुभव देणारी आहे. रेडबेल मीडिया निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन अक्षय जयसिंगराव शिंदे यांनी केले आहे.



चित्रपटाच्या नावावरूनच भूषण प्रधान आपल्या 'स्वप्नसुंदरी'च्या शोधात असल्याचे दिसून येते. मात्र हा शोध त्याला कुठे घेऊन जाणार, त्याच्या आयुष्यात काय बदल घडवणार आणि त्याला त्याची स्वप्नसुंदरी खरंच मिळणार का, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. मात्र या सर्व प्रश्नांची उत्तरं येत्या २४ जुलैला प्रेक्षकांना चित्रपटगृहांमध्ये मिळणार आहेत.


चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक अक्षय जयसिंगराव शिंदे म्हणतात, ''प्रत्येकाच्या आयुष्यात काही स्वप्नं असतात, काही इच्छा असतात आणि कुणीतरी खास व्यक्ती असते ज्याचा आपण शोध घेत असतो. 'स्वप्नसुंदरी' ही त्या शोधाची, त्या भावनांची आणि त्या नात्यांच्या प्रवासाची गोष्ट आहे. प्रेक्षकांना या कथेमध्ये स्वतःच्या आयुष्यातले अनेक क्षण दिसतील. हा चित्रपट त्यांच्या मनाला स्पर्श करेल, त्यांना विचार करायला लावेल आणि त्याचवेळी त्यांना एक वेगळी अनुभूती देईल.''

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.