Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*‘तुंबाडची मंजुळा’चं भन्नाट पोस्टर प्रदर्शित*

 *‘ती’ आली… आणि सगळ्यांचा उडा


ला थरकाप!*

*‘तुंबाडची मंजुळा’चं भन्नाट पोस्टर प्रदर्शित*

 

झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या तुंबाडची मंजुळा या चित्रपटाचं नवीन पोस्टर सोशल मीडियावर प्रकाशित झालं असून तो सध्या चर्चेचा विषय बनलं आहे. लाल साडी आणि पैंजणाने सजलेलं एका स्त्रीचं भारदस्त पाऊल जे गावाच्या आणि गावकऱ्यांच्या दिशेने पडतंय आणि ते बघून भेदरलेले गावकरी पळ काढतायत अशी भन्नाट संकल्पना या पोस्टरमधून मांडण्यात आली आहे. या सगळ्या गोंधळात एक भन्नाट कॉमिक टचही जाणवतो. यावरून हा चित्रपट केवळ घाबरवणार नाही, तर प्रेक्षकांना खळखळून हसवणार असल्याचेही स्पष्ट होतंय. 

 

पोस्टरमधील कोकणातील गावाचं वातावरण, उडणारी धूळ, घाबरलेले लोक आणि त्यांच्यावर घोंगावणारी ती सावली सगळंच काहीतरी अनपेक्षित घडणार असल्याची चाहूल देतं. त्यामुळे ही ‘मंजुळा’ नक्की आहे तरी कोण? भूत? की काहीतरी वेगळंच? या सगळ्या गोंधळामागे नेमकं काय रहस्य दडलंय ते उलगडण्यासाठी प्रेक्षकांना ५ जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

 

या पोस्टरच्या अनोख्या संकल्पनेबद्दल बोलतांना  स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणतात, “कोणत्याही चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण करणाऱ्या मुख्य घटकांमध्ये पोस्टरची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. यामुळेच या पोस्टरमधून चित्रपटाच्या गोष्टीचा, विषयाचा अंदाज यावा शिवाय ते गूढही कायम राहावं असा विचार होता. या सोबतीनेच यातील एकाहून एक मातब्बर कलाकारांचीही नव्याने ओळख व्हावी या उद्देशाने हे पोस्टर बनवले आहे. यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढेल याची खात्री आहे. कोकणातील गाव, तिथली अतरंगी माणसं आणि ‘मंजुळा’ या गूढ पात्राभोवती फिरणारी ही कथा प्रेक्षकांना वेगळाच अनुभव देईल. हा पूर्णपणे कॉमेडी हॉरर एंटरटेनर असून सहकुटुंब पाहाण्यासारखा आहे.” 

 

ऋषिकेश तुरई यांच्या लेखनातून साकारलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन विविध कोरगांवकर यांनी केलं असून, यात जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, ओम भुतकर, मकरंद अनासपुरे, अंशुमन विचारे, योगेश शिरसाट, गणेश पंडित, सिद्धेश्वर झाडबुके, वर्षा दांदळे, शार्दुल सराफ, रीलस्टार अथर्व रुके, प्रियल नाईक आणि उषा नाडकर्णी यांची दमदार फौज पाहायला मिळणार आहे. झी स्टुडिओजचे उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, हा चित्रपट ५ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.