Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते 'लाडकी बहीण' चित्रपटाचा टीझर लॉन्च...

 उपमुख्यमंत्री  एकनाथजी  शिंदे यांच्या



हस्ते 'लाडकी बहीण' चित्रपटाचा टीझर लॉन्च...

१५ मे ला चित्रपटगृहात होणार प्रदर्शित!


महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री  एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते आणि राज्यातील दिग्गज मंत्र्यांच्या उपस्थितीत काल 'लाडकी बहीण' या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर दिमाखात प्रदर्शित करण्यात आला. या सोहळ्याला राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळाली. या कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे, आमदार संदीप क्षीरसागर, शितल म्हात्रे  पाणीपुरवठा मंत्री . गुलाबराव पाटील, राज्यमंत्री  योगेश कदम आणि उद्योगमंत्री  उदय सामंत यांसारख्या दिग्गज नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती. 


टीझर लॉन्च दरम्यान बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चित्रपटाच्या टीमचे कौतुक केले. ते म्हणाले की, "हा चित्रपट केवळ मनोरंजन नसून, महाराष्ट्र शासनाच्या 'माझी लाडकी बहीण' योजनेचा आणि इतर लोकोपयोगी योजनांचा लाभ सर्वसामान्य महिलांपर्यंत कसा पोहोचत आहे, याचे जिवंत दर्शन घडवणारा आहे." उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना कळकळीची विनंती केली की, "येत्या १५ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. सर्वांनी सहकुटुंब थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा पाहावा. शासन आपल्या पाठीशी कसे खंबीरपणे उभे आहे आणि या योजनांचा फायदा घेऊन आपण आपले जीवन कसे समृद्ध करू शकतो, हे या चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्यात आले आहे."


राज्यातील महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारा 'लाडकी बहीण' हा चित्रपट येत्या १५ मे ला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून शासनाच्या विविध योजनांची माहिती रंजक पद्धतीने मांडली गेल्याने प्रेक्षकांमध्ये आतापासूनच मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.



शुभम फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत 'लाडकी बहीण' चित्रपटाच्या दिग्दर्शिका शितल शिंदे असून, त्यांनी शनिदेव फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मितीही केली आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद गणेश शिंदे यांनी लिहिले आहेत. शेखर मते या चित्रपटाचे सहनिर्माते असून बाबासाहेब पाटील कार्यकारी निर्माते आहेत. बाबा लाड, चैतन्य साळुंखे यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे. या चित्रपटात स्मिता तांबे मुख्य भूमिकेत झळकणार असून, तिच्या जोडीला सुरेखा कुडची, उषा नाडकर्णी, उषा नाईंक, गौतमी पाटील, रुक्मिणी सुतार (सरू आजी), सारिका जाधव, पूनम कापसे, माधव अभ्यंकर, शशांक शेंडे, अनिल नगरकर, सुरेश विशावकर्मा, सिद्धेश्वर झाडबुके, संजय खापरे, गणेश शिंदे, दर्शना जोकरे, शंभो महाजन, मेगा शिंदे आदी कलाकार आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.