Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*सासू-सुनेच्या नात्यावर आधारित मनोरंजक 'कप बशी'*

*सासू-सुनेच्या नात्यावर आधारित मनोरंजक 'कप बशी'*

*पूजा सावंत, निर्मिती सावंत आणि ऋषी मनोहर यांची मध्यवर्ती भूमिका*



*वैभव चिंचाळकर दिग्दर्शित "कप बशी" ५ जूनपासून संपूर्ण महाराष्ट्रात*

*'कप बशी' चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच*


सासूृृ-सुनेचं नातं हे एव्हरग्रीन असतं. या नात्यामध्ये प्रेम, आदर, राग, रुसवे फुगवे अशा वेगवेगळ्या भाव-भावना असतात. याच नात्यातली एक वेगळी गोष्ट आता "कप-बशी" या आगामी चित्रपटात पाहता येणार आहे. वैभव चिंचाळकर दिग्दर्शित हा चित्रपट ५ जूनला संपूर्ण महाराष्ट्रात ​​प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाचं पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं.  


सुकल्प चित्र या निर्मिती संस्थेने "कप बशी" या चित्रपटाची निर्मिती केली असून कल्पक सदानंद जोशी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर बिग ब्रेन प्रॉडक्शन्सच्या निलेश राठी यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाची पटकथा ​​​, संवाद चेतन सैंदाणे यांनी लिहिलेले आहे. चित्रपटात अभिनेत्री  निर्मिती सावंत, पूजा सावंत अभिनेता ऋषी मनोहर, नयना आपटे, अनंत जोग, राहुल रानडे, विनय येडेकर, चिन्मय शिंत्रे, पूर्णिमा तळवलकर, आनंद काळे अशी तगडी स्टारकास्ट असल्यामुळे उत्तम अभिनयाची मेजवानी या चित्रपटातून प्रेक्षकांना मिळणार आहे यात शंका नाही.गीतकार गुरु ठाकूर यांनी लिहिलेल्या गीतांना  चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ संगीतकार उत्तम सिंग यांनी या चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन लाभलं आहे. बाळू दहिफळे यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले असून संकलन आशिष म्हात्रे यांचे आहे. नृत्य दिग्दर्शन दीपाली विचारे, कला दिग्दर्शन मंगेश कुडाळकर तर प्रोजेक्ट हेड म्हणून चिन्मय शिंत्रे यांनी काम पाहिले आहे.




अरूण आणि अरूणा हे दांपत्य त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी मुलगी शोधत असतात. परंतु ​अरूणा यांच्या अध्यात्मिक गुरूनं सूनेबाबत काही अटी सांगितल्या आहेत. त्या अटींनुसार अरूणा मुलगी शोधत असतात. त्यांना तशीच मुलगी सापडते का? नक्की अशी कोणती अट आहे? त्यांचे पुढे लग्न जुळत की नाही? अशा धमाल आशयसूत्रावर "कप बशी" हा चित्रपट आधारित आहे. आताच्या आधुनिक काळातही पत्रिका पाहण्यासारख्या परंपरांवर भाष्य करत अत्यंत मनोरंजक पद्धतीने कथानक मांडण्यात आलं आहे. उत्तम अभिनेत्यांची फौज या चित्रपटात असल्यानं प्रेक्षकांना पुरेपूर मनोरंजन अनुभवायला मिळेल त्यासाठी ५ जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.