Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मनोरंजनाचा पॉवर-प्ले, झी मराठीवर मालिकांमध्ये नवा सामना सुरू!*

*मनोरंजनाचा पॉवर-प्ले, झी मराठीवर मालिकांमध्ये नवा सामना सुरू!*




क्रिकेट म्हटलं की मैदानावर चौकार-षटकारांचा वर्षाव, तणावपूर्ण सामने हा थरार ठरलेला असतो. आता हाच थरार प्रेक्षकांना आपल्या आवडत्या मालिकांमध्येही अनुभवायला मिळणार आहे.हो हे खर आहे कारण झी मराठीवर सुरु होतोय मनोरंजनाचा पॉवर-प्ले. 

 

झी मराठी घेऊन येत आहे *मनोरंजनाचा “पॉवर-प्ले”* ! या “पॉवर-प्ले” मध्ये प्रत्येक मालिकेत नवे ट्विस्ट, अनपेक्षित वळणं आणि रोमहर्षक घडामोडी प्रेक्षकांना खिळवून ठेवणार आहेत. ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत नात्यांची नवी कसोटी पाहायला मिळेल, तर ‘वीण दोघातली ही  तुटेना’ मध्ये भावनांचा संघर्ष अधिक तीव्र होणार आहे. ‘लक्ष्मी निवास’ मध्ये घरातील सत्तासंघर्ष रंगणार असून ‘कमळी’मध्ये कमळीच्या आयुष्यात मोठा टर्निंग पॉइंट येणार आहे. ‘तुला जपणार आहे’ मध्ये रहस्य अधिक गहिरे होणार, तर ‘तारिणी’ मध्ये प्रेम आणि जबाबदारी यांचा खरा कस लागणार आहे. ‘शुभ श्रावणी’मध्ये नात्यांची गुंतागुंत नव्या रूपात समोर येईल, तर ‘देवमाणूस – मधला अध्याय’ लाली आणि गोपाळ मधली चुरस प्रेक्षकांना खिळवून ठेवेल. प्रत्येक मालिकेतली ही चुरस आणि आपल्या आवडत्या पात्रांचे चौकार षटकार यांनी मालिकेतील हा सामना नक्कीच रंगतदार होणार यात शंका नाही. झी मराठीवरील या लोकप्रिय मालिका जिथे प्रत्येक पात्र आपापल्या पद्धतीने खेळी करताना दिसणार आहे.






*षडयंत्रांच्या गुगलीला फ्रंट-फुटवर येऊन चोप देणारे हे सगळे क्षण प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहेत. तेव्हा संध्या. ६.३० वा. ते रात्री. ११ वा. सज्ज व्हा मनोरंजनाच्या या पॉवर-प्लेसाठी… फक्त आपली झी मराठी.*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.