Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*एकीच्या काळजात ज्वाला सुडाची, तर दुसरीच्या मनात ज्योत प्रेमाची !*

*एकीच्या काळजात ज्वाला सुडाची, तर दुसरीच्या मनात ज्योत प्रेमाची !*

*तुटलेल्या मनाला जोडू शकेल का तिची ज्योत प्रेमाची ?*

 



झी मराठीवर येत्या एप्रिल महिन्यापासून एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे *'दीपज्योती'.*  ही गोष्ट आहे प्रेमाने आपलूलकीने बांधलेल्या बहीण भावांच्या नात्याची ज्योती, तिच्या दोन बहिणी आणि भावाची. ज्योतीच्या परिवाराची कहाणी अशी कि  ज्योतीचे वडील दारू प्यायचे, दारूतच त्यांनी स्वतःच्या आयष्याचं मातरें करून घेतलं आणि संपूर्ण जबाबदारी ज्योतीच्या मोठ्या भावावर म्हणजे अभिजीत वर येऊन पडली. लहान वयातच त्याला शिक्षण सोडून कुटुंबाची जबाबदारी घ्यावी लागली. या घरामध्ये पैसे हातात खेळत नसला तरी सद्धा आनंदाचं वातावरण आहे. ज्योतीला शिकून चांगली नोकरी करण्याची इच्छा आहे. 

 

तर दुसरीकडे आहे एक घरंदाज कुटुंब ज्याचे प्रमुख आहेत पुरुषोत्तम त्यांचे तीन मुलं   *स्वराज* *, दीप* ,  *विराज*  आणि सोबत असते आत्या. स्वराज पुरुषोत्तमची कार्बन कॉपी असनू त्याला आपल्या वडिलांचा शून्यातून उभा केलेला बिजनेस पुढे न्यायचाय. विराज मात्र स्वतःच्या नोकरीमध्ये आनंदी आहे. पण दीपचा त्याच्या वडिलांवर जास्त राग आहे. दीप लहान असताना त्याची आई गेल्याने आपल्या बायकोच्या मृत्यूला दीपचं जबाबदार आहे अशी पुरुषोत्तम यांची धारणा झाली. तेव्हापासून ते दीपचा तिरस्कार करतात. आई गेल्यानंतर दीपराज दारूच्या आहारी गेलेला आहे. 

गोष्ट सुरु होते तीच एका धक्कादायक घटनेने. एका क्षणात आनंदाला दुःखाचं ग्रहण लागत. तर  कसे दीप आणि ज्योती भेटणार त्यांचा  प्रवास कसा सुरु होणार हे बघणं मनोरंजक असणार आहे.  

 



मालिकेत दीप आणि ज्योतीच्या भूमिकेत *प्रसाद जवादे* आणि *पूर्वा कौशिक* पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तर *डॉ. गिरीश ओक* आणि *सुहास परांजपे* ह्यांच्यासुद्धा महत्वपूर्ण भूमिका असणार आहेत. या मालिकेचं *लेखन केलय अश्विनी अनगळ* आणि *सायली कुलकर्णी* ह्यांनी तर *संवाद लेखन केलय इरफान मुजावर* यांनी, मालिकेचं *दिग्दर्शन केलय अमित सावर्डेकर* यांनी. 

 

*तेव्हा बघायला विसरू नका नवी मालिका 'दीप ज्योती' १३ एप्रिलपासून दररोज रात्री ८ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.